Crime: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला अन्...

Uttar Pradesh Crime: क्रिकेट कोचने २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. उत्तर प्रदेशच्या वाराणसीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी कोचला अटक केली. आरोपीने आधी देखील एका मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणी त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले होते.
Crime: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला अन्...
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

क्रिकेट खेळाडूंवर बलात्कार केल्याप्रकरणी क्रिकेट कोचला पोलिसांनी अटक केली. मोफत कोचिंग आणि टीममध्ये सिलेक्शन करण्याचे आमिष दाखवत या दोन अल्पवयीन मुलींचा त्याने छळ केला होता. कोच मुरलीलाल याच्याविरोधात वाराणसीच्या भेलुपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपी क्रिकेट अकॅडमी चालवतो. त्याच्यावर १४ ते १५ वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अटक झालेल्या कोचवर याआधी देखील अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. आरोपी या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा देखील भोगून आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा दोन अल्पवयीन मुलीवर क्रिकेट शिकवण्याच्या बहाण्याने बलात्कार केला. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली. अटक झाल्यानंतर आरोपी कोच ढसाढसा रडला आणि पोलिसांसमोर विनवणी करताना दिसला.

Crime: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला अन्...
AhilyaNagar Crime: डान्सर दिपाली पाटील विवाहित, दोन मुलांची आई; कला केंद्रातील नृत्यांगना आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट

आरोपी मुरारी लाल उर्फ गौतम गोड हा सीर गोवर्धनपूरमधील मुलांना क्रिकेट शिकवतो. आरोपी कोचने खेळाडूंना प्रमुख क्रिकेट संघांमध्ये निवडण्यास मदत करण्याचा दावा केला. भेलुपूर पोलिस स्टेशन परिसरातील १४ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली क्रिकेटचे धडे घेण्यासाठी त्याच्याकडे आल्या होत्या. कोचने त्यांना उत्तर प्रदेश १४ वर्षांखालील क्रिकेट संघात निवडण्याचे आमिष दाखवले आणि मोफतमध्ये प्रशिक्षण देतो असे सांगितले.

Crime: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला अन्...
Kolhapur Crime: कॅफेच्या आड चालायचा भलताच प्रकार! कॅफेत स्पेशल रुम अन् सापडली कंडोमची पाकीटं

त्याने एका मुलीवर वैद्यकीय तपासणी करण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीवर सलग तीन वेळा बलात्कार केला. मुलीची प्रकृती बिघडली त्यामुळे तिच्या आईने तिला रुग्णालयात नेले. त्याठिकाणी या मुलीने डॉक्टरांना कोचने केलेल्या भयंकर कृत्याची माहिती दिली तेव्हा सर्वांना धक्का बसला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे क्रीडा जगतात खळबळ उडाली.

Crime: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला अन्...
Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी कोचविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपी कोचने २०२१ मध्येही असेच कृत्य केले होते. त्यावेळी त्याने केंद्रीय विद्यालयात प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन एका विद्यार्थीनीवर बलात्कार केला होता. या प्रकरणी त्याने जेलची हवा देखील खाल्ली होती. आरोपीच्या या कृत्यामुळे त्याच्या बायकोने त्याला घटस्फोट दिला आहे.

Crime: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला अन्...
Kolhapur Crime : कोल्हापुरात खळबळ; भररस्त्यात दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com