Ulhasnagar News: धक्कादायक! वयोवृद्ध व्यक्तीचा गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरू, कारण अस्पष्ट

Ulhasnagar Crime: उल्हासनगरमध्ये रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एका वयोवृद्ध व्यक्तीने स्वतःला रिवाल्वरने गोळी मारून घेतल्याची घटना घडली आहे.
Ulhasnagar Crime:
Ulhasnagar Crime: Saamtv
Published On

उल्हासनगर, ता. १३ जुलै २०२४

वयोवृद्ध व्यक्तीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. या घटनेत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Ulhasnagar Crime:
Maharashtra Politics: गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू; अंबादास दानवेंची परखड टीका

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उल्हासनगरमध्ये रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एका वयोवृद्ध व्यक्तीने स्वतःला रिव्हॉल्वर गोळी मारून घेतल्याची घटना घडली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून जखमी व्यक्तीला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील शिवनगर शिवसेना शाखा समोर असलेल्या बंगल्यात ही घटना घडली आहे. जगदीश चव्हाण (वय,६०) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. चव्हाण यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न का केला? तसेच चव्हाण यांनी रिव्हॉल्वर कोठून आणले? याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.

Ulhasnagar Crime:
Crime News: १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांकडून आळीपाळीने अत्याचार; छत्रपती संभाजीनगर शहरातील संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com