उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झाशीमधील परगणा गावातील कबुतरा डेरा येथे पोलीस छापेमारी करून 500 लिटर अवैध दारू आणि तीन हजार किलो यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. धक्कादायक म्हणजे ही दारू ज्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीत साठा केलीली होती ते पाहून पोलीसही चक्रावले आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाशीमधील परगणा गावातील कबुतरा डेरायेथे अवैध दारू बनवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचं पथकाने घटनास्थळी छापा टाकला. याठिकाणी पोलिसांना काही हॅन्डपंप आढळले. पाण्याचे पंप असावेत म्हणून पोलिसांनी ते चालवून बघितले, मात्र त्यातून पाण्याऐवजी दारू बाहेर यायला सरुवात झाली. बघता बघता दारूचे पाट वहायला लागले. त्यामुळे सुरुवातीला पोलीसही गोंधळून गेले.
नेमका प्रकार काय आहे याची पोलिसांनी कसून तपासणी केली असता, हॅन्डपंपखाली जमिनीत दारूचे ड्रम बसवण्यात आले होते. जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. याची खात्री झाल्यांतर पोलिसांनी सर्व हॅन्डपंप उदध्वस्त केले आणि ५०० लिटर दारूचा साठा जप्त केला आहे. दारू प्रक्रियेसाठी लागणारे तीन हजार किलो साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.