Crime: शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य, बेशुद्धावस्थेत...; हादरवून टाकणारं कारण

Chhattisgarh Crime: छत्तीसगडमध्ये भयंकर घटना घडली. नवरा-बयकोने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिला बेदम मारहाण केली आणि तिचा गळा आवळला. मृत्यू झाल्याच्या समजून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. शुद्धीत आलेल्या महिलेने पोलिस ठाणे गाठले.
Crime: शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य, बेशुद्धावस्थेत...; हादरवून टाकणारं कारण
Chhattisgarh CrimeSaam tv
Published On

छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये भयंकर घटना घडली. महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोलगेट टाकलं नंतर गळा दाबून मारण्याचा प्रयत्न कला. जमिन हडपण्यासाठी एका दाम्पत्याने शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत हे भयंकर कृत्य केले. महिलेचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडामध्ये नवरा-बायकोंनी शेजारच्या घरात झोपलेल्या एका महिलेचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेचा मृत्यू झाला नाही हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर कोलगेटने हल्ला केला. त्यांनी पेस्ट काढून महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली. आरोपी महिलेला मृत समजून त्यांनी तिथून पळ काढला. जमीन हडपण्यासाठी आरोपींनी हा कट रचला होता. पीडित महिलेवर आरोपी एकतर्फी प्रेम करत होता. या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या बायकोने त्याला साथ दिली.

Crime: शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य, बेशुद्धावस्थेत...; हादरवून टाकणारं कारण
Lonavala Crime : मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव; लोणावळ्यात दोन ठिकाणी चोऱ्या, सहा लाखाचा ऐवज लांबविला

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी लखमा कुंजाम आणि त्याची पत्नी कुमे कुंजाम यांना अटक केली आहे. हे प्रकरण किरंदुल पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ च्या रात्री महिला तिच्या घरात झोपली होती. या दरम्यान शेजारी राहणारा लखमा आणि त्याच्या पत्नीने महिलेची टॉवेलने गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोलगेट टाकले. महिलेला मृत समजून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

Crime: शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य, बेशुद्धावस्थेत...; हादरवून टाकणारं कारण
Crime: भयंकर! बलात्कारप्रकरणी १४ वर्षे तरूंगावासाची शिक्षा, बाहेर आल्यानंतर दत्तक घेतलेल्या मुलीवर केला रेप

पोलिसांनी पुढे सांगितले की, सकाळपर्यंत महिला अर्धनग्न अवस्थेत घरात पडून होती. तिचा श्वास चालू होता हे पाहून आरोपींनी स्वतःच गावात आरडाओरडा केला आणि सर्वांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास करताना पोलिसांनी महिलेचे कुटुंब आणि शेजाऱ्यांची चौकशी केली. यावेळी लखमा कुंजाम आणि त्यांची पत्नी कुमे कुंजाम वारंवार त्यांचे जबाब बदलत होते. यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. जमीन हडपण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे मान्य केले.

Crime: शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य, बेशुद्धावस्थेत...; हादरवून टाकणारं कारण
Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com