CCTV Footage: बॅटने मारहाण करत भाजी विक्रेत्याची हत्या, पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अटक

Jaipur Crime News: एका भाजीपाला विक्रेत्याला बॅटने अमानुष मारहाण करत हत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या मारहाणीत भाजी विक्रेत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
CCTV Footage
CCTV FootageSaam Digital

Rajasthan Crime News

एका भाजीपाला विक्रेत्याला बॅटने अमानुष मारहाण करत हत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये(Rajasthan) घडली आहे. या मारहाणीत भाजी विक्रेत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हल्ला करणाऱ्या तरुणाचे वडील राजस्थानमध्ये पोलीस अधिकारी आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CCTV Footage
Kolhapur Crime News : शीर नसलेला मृतदेह आढळल्याने कोल्हापुरात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, राजस्थानच्या जयपूरमधील(Jaipur) करणी विहार परिसरात मंगळवारी(२ एप्रिल) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोहन असं मृत तरुणाचे नाव असून तो जयपूरमधील जगदंबा नगर कॉलनीतील रहिवासी होता. मोहन भाजीपाल्याची हातगाडीवर विक्री करायचा.(latest Crime News)

घटनेच्या काही दिवसांपूर्वी आरोपी क्षितीज आणि पीडित तरुणामध्ये काही कारणांवरुन किरकोळ वाद झाला होता. मात्र मंगळवारी त्या वादाचा राग मनात ठेवून क्षितीज आणि मोहनमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. त्यावेळी क्षितीजने मोहनच्या डोक्यात बॅटने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर मोहन जमिनीवर कोसळला.

गंभीर जखमी झालेल्या मोहनला आरोपी तरुणाच्या कुटुंबियांनीच रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी मोहनला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेत तपास सुरु केला. सध्या पोलिसांनी क्षितीजला अटक केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नक्की काय?

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये,पीडित तरुण मोहन हा रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे. काही वेळानंतर क्षितीज घराबाहेर येताना दिसत आहे.

त्याच्या हातात बॅट दिसत आहे. घराबाहेर येताच क्षितीजने पीडित तरुणावर बॅटने जोरदार वार केला. क्षितीज लागोपाठ मोहनवर बॅटने हल्ला करत आहे. काही वेळानंतर मोहन जमिनीवर पडतो.मोहनच्या आवाजाने आरोपीचे वडील घराबाहेर येताना दिसत आहेत. मात्र ते काही करतील तोपर्यंत उशीर झाला होता.

CCTV Footage
Kalyan Crime News : महाराष्ट्रासह तेलंगणात घरफोडी दोघे गजाआड, कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com