Shocking News: १२५ किडनी, ५० जणांची हत्या; मृतदेह मगरींना खायला टाकले, सीरियल किलर डॉक्टरची कुंडली आली समोर

Serial Killer Doctor: दिल्ली पोलिसांनी सिरिअल किलर डॉक्टरला अटक केली आहे. हा डॉक्टर डेथ नावाने ओळखला जातो. या डॉक्टरने ५० जणांची निर्घृण हत्या केली आणि त्यांचे मृतदेह तलावात फेकले. तर १२५ किडनी प्रत्यारोपण केले.
Shocking News: १२५ किडनी, ५० जणांची हत्या; मृतदेह मगरींना खायला टाकले, सीरियल किलर डॉक्टरची कुंडली आली समोर
Serial Killer DoctorSaam Tv
Published On

दिल्ली पोलिसांनी अटक ५० हून अधिक हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. देवेंद्र शर्मा उर्फ ​​'डॉक्टर डेथ'ला अटक केली. हा देवेंद्र शर्मा हा कुणी डॉक्टर नाही तर तो कु्ख्यात गुन्हेगार आहे. आयुर्वेदिक डॉक्टर आणि सीरियल किलर बनलेला देवेंद्र शर्मा गेल्या वर्षी पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील बांदिकुई शहरात तो बाबा म्हणून राहत होता. आपले भूतकाळातील गुन्हे लपविण्यासाठी आणि ओळख पटू नये म्हणून त्याने 'दयादास महाराज' या नावाने स्वतःची ओळख निर्माण केली आणि एक मंदिर बांधले. तो संताच्या वेषात होता आणि आध्यात्मिक गुरू म्हणून सगळीकडे मिरवत होता. ऐवढंच नाही तर या ठिकाणी तो लोकांवर उपचार करण्याचे नाटक करत होता.

देवेंद्र शर्मा हा काही सामान्य गुन्हेगार नाही. त्याने ५० जणांची हत्या केली आणि १२५ किडनी प्रत्यारोपण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा आतापर्यंत ५० हून अधिक हत्या प्रकरणात सहभागी आहे. तो हत्या करायचा आणि त्यांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील कासगंज येथील हजारा कालव्यात फेकून द्यायचा. यामागचा त्याच उद्देश एकच होता की हे मृतदेह मगरी खातील आणि पुरावे कायमचे नष्ट होतील.

Shocking News: १२५ किडनी, ५० जणांची हत्या; मृतदेह मगरींना खायला टाकले, सीरियल किलर डॉक्टरची कुंडली आली समोर
Crime News : 'तुझा भाऊ नाल्याजवळ पडलाय'; मित्रानेच केली २२ वर्षीय मित्राची हत्या, संभाजीनगर हादरलं

देवेंद्र शर्माकडे आयुर्वेद (BAMS) पदवी होती आणि त्याने वैद्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण १९९४ मध्ये एका गॅस एजन्सी करारात त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. तिथूनच त्याच्या आयुष्याला गुन्हेगारी वळण मिळाले. त्याने बनावट गॅस एजन्सी चालवायला सुरुवात केली आणि हळूहळू तो किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा भाग बनला. १९९८ ते २००४ पर्यंत देवेंद्र शर्माने देशाच्या विविध भागात १२५ हून अधिक बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण केले. यामध्ये अनेक डॉक्टर आणि दलाल सहभागी होते. पैशाच्या लोभापायी त्याने १२ हून अधिक गरीब लोकांच्या किडन्या विकल्या.

Shocking News: १२५ किडनी, ५० जणांची हत्या; मृतदेह मगरींना खायला टाकले, सीरियल किलर डॉक्टरची कुंडली आली समोर
Pune Crime : मुसळधार पाऊस, वस्तीवर काही लोकं आली अन् एकच आरडाओरडा, दौंडमधल्या चोरीची अख्ख्या पुण्यात चर्चा

२००२ ते २००४ दरम्यान देवेंद्र शर्माने एक नवीन गुन्हेगारी पद्धत शोधून काढली. तो त्याच्या साथीदारांसह टॅक्सी आणि ट्रक चालकांना बनावट ट्रिपसाठी बोलावायचा. वाटेत तो त्यांची क्रूपपणे हत्या करायचा आणि त्यांची वाहने राखाडी बाजारात विकायचा. त्यानंतर मृतदेह हजारा कालव्यात मगरींना खाण्यासाठी फेकायचा. २००४ मध्ये देवेंद्र शर्माला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये सात वेगवेगळ्या हत्येप्रकरणी गुन्हे दाखल होते. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. एका प्रकरणात गुरुग्राम न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली होती.

Shocking News: १२५ किडनी, ५० जणांची हत्या; मृतदेह मगरींना खायला टाकले, सीरियल किलर डॉक्टरची कुंडली आली समोर
Dombivli Crime : डोंबिवली हादरली! १५ वर्षीय मुलीचं अपहरण, खोलीत कोंडून लैंगिक अत्याचार, गर्भपातानंतर नको ते केलं...

२०२३ मध्ये देवेंद्र शर्माला पुन्हा एकदा पॅरोलवर सोडण्यात आले. पण ३ ऑगस्ट रोजी त्याचा पॅरोल संपल्यानंतर देखील तो तुरुंगात परतला नाही. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा त्याचा शोध घेतली होती. सहा महिने चाललेल्या शोध मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने अलीगढ, जयपूर, दिल्ली, आग्रा आणि प्रयागराजपर्यंत त्याचा शोध घेतला. शेवटी त्याला राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील एका आश्रमातून अटक करण्यात आली जिथे तो लोकांना बाबा म्हणून उपदेश करत होता. लोकं देखील मोठ्या संख्येने त्यांच्याकडे यायची. या डॉक्टर डेथने पोलिसांनाही चक्रावून सोडलं.

Shocking News: १२५ किडनी, ५० जणांची हत्या; मृतदेह मगरींना खायला टाकले, सीरियल किलर डॉक्टरची कुंडली आली समोर
Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बायकोला गळा चिरुन संपवलं, मृतदेह शेणात लपवला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com