Beed Crime: अवैध वाळू माफियांची मुजोरी; पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली कार

Sand Mafia Beed: सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली आहे.
Beed Crime
Beed Crimesaam Tv
Published On

Beed Crime News:

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध वाळू माफियांची मुजोरी समोर आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. या घटनेत पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. (Latest News)

गेवराई तालुक्यातील राक्षस भुवनजवळ ही घटना घडलीय. गणेश मुंडें असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी दोन आरोपी विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस पथक सकाळी सहा वाजता म्हाळस पिपंळगाव येथील गोदावरी पात्रात जात होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि पोलीस कर्मचारी विष्णू वायबसे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पथक राक्षसभुवन फाट्याजवळ आले त्यावेळी वाळू माफियाच्या कारने पथकाच्या वाहनाला धडक दिली. या धडकेत मुंडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. तर वायबसे हे पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे गणेश मुंडे आणि पोलीस कर्मचारी वायबसे हे गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगावच्या वाळू साठ्याची पाहणी करून राक्षसभुवनकडे जात होते. त्यावेळी राक्षसभुवन फाट्यावर काळ्या रंगाची बिना नंबरची कार थांबलेली होती. ही कार गणेश मुंडे यांच्या कारचे लोकेशन घेत निघालेली होती. त्यावेळी मुंडे यांनी त्या काळ्या रंगाच्या कारला हात दाखवला आणि विचारपूस करण्याचा प्रयत्न केला.

त्या गाडीतील चालकाने गणेश मुंडेंच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यात मुंडेंच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी हा जालना जिल्ह्यातील गोंदी येथील असल्याचं सांगितलं जात आहे.

Beed Crime
Pune News: भरधाव थार गाडीने श्वानाला चिरडले, प्राणीप्रेमींचा संताप; चालकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com