२५ जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती.
Sassoon Hospital Pune Mirror

Sassoon Hospital : ससूनमध्ये 4 कोटींचा घोटाळा! आरोपींचा अटपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Sassoon Hospital Embezzlement Case : एकूण २५ जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती.
Published on

Sassoon Hospital News: पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या रुग्णालयात तब्बल ४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. बँक खात्यातून तब्बल चार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

२५ जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती.
Sassoon Hospital: ससूनमधील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड, सहप्राध्यापकाला केले अधीक्षक; यलप्पा जाधव यांच्यावर कारवाई होणार का?

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी एकूण २५ जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती.

रुग्णालयाच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून चार कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये काढून स्वतःसह अन्य आरोपींच्या खात्यावर जमा केले. रुग्णालयात अकाउंटंट म्हणून काम करणारे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांचा हा प्रकरणात प्रमुख हात असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी रुग्णालयाच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून चार कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये काढले. तसेच स्वतःसह अन्य आरोपींच्या खात्यावर जमा केले, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

रुग्णालयाच्या आर्थिक नोंदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ससून प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील १३ आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. हा गुन्हा फार मोठा आहे. आरोपींनी हा घोटाळा का केला. बँकेतील रक्कम कुणाला दिली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवणे महत्वाचे आहे. मात्र आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला तर ही उत्तरे मिळवणे फार कठीण होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

यामध्ये रुग्णालयाच्या वरिष्ठ सहायक रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, संतोष जोगदंड, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, दयाराम कछोटिया, शेखर कोलार,अनिता शिंदे, कक्षसेवक नीलेश शिंदे, अर्चना अलोटकर, वरिष्ठ लिपिक दीपक वालकोळी, सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ,राखी शहा, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

२५ जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती.
Sassoon Hospital: ससून हॉस्पिटलमध्ये आणखी एक घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच हडपले 4 कोटी 18 लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com