Pune Crime: बायकोशी वाद.. चिडलेल्या जावयाने सासुच्या दुचाकीसह १५ गाड्या पेटवल्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News: बायकोशी झालेल्या वादानंतर एका तरुणाने तब्बल १५ गाड्या पेटवल्याची घटना शहरातील सिंहगड रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime
Pune Crime Saam Tv

नितीन पाटणकर, पुणे|ता. २ मे २०२४

पुणे शहरातील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शहरात कोयता गँगची दहशत, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ अशा घटना सर्रास घडताना दिसत आहेत. अशातच बायकोशी झालेल्या वादानंतर एका तरुणाने तब्बल १५ गाड्या पेटवल्याची घटना शहरातील सिंहगड रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बायकोसोबत झालेल्या वादातून सासरवाडीत आलेल्या जावयाने सासूच्या दुचाकी गाडीसह सासुरवाडीतील रस्त्यावर पार्क केलेल्या तब्बल 15 दुचाकी पेटवल्याची घटना समोर आली आहे. पुण्यामधील सिंहगड रस्त्यावर असलेल्या वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा इमारती समोरील पार्किंग मधील ही घटना आहे. गणेश दिनकर दहिभाते (वय ३५) असे गाड्या पेटवणाऱ्या जावयाचे नाव आहे.

याबाबत महिला फिर्यादीने आपल्या जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी गणेश दहिभाते यांनी त्याच्या पत्नीसोबत वाद केला होता. या वादातून फिर्यादी महिलेला आरोपीने हानी पोहोचावे या उद्देशाने जाणीवपूर्वक फिर्यादीची आणि शेजारी असलेल्या पंधरा गाड्या पेटवल्या.

Pune Crime
Andheri Fire: ब्रेकिंग! अंधेरी पंप परिसरात भीषण अग्रितांडव; दारूचे दुकान जळून खाक

दरम्यान, या धक्कादायक घटनेने सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या जाळपोळ प्रकरणी आरोपी गणेश दिनकर दहिभाते याच्यावर सिंहगड रोड पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Pune Crime
Mumbai Court Raps Ed: खटल्याला उशीर झाला, आरोपींनी अधिकची शिक्षा भोगली, ईडीला कोर्टाने फटकारलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com