Pune Crime: पुणे पोलिसांचा दणका! एकाच दिवशी ४२ गुन्हेगार तडीपार; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

Pune Crime News: पुणे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एकाच दिवशी तब्बल 42 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
pune police
pune policesaam tv

सागर आव्हाड, पुणे|ता. २४ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एकाच दिवशी तब्बल 42 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरात (Pune) गंभीर गुन्हे करणाऱ्या 42 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये चार टोळी प्रमुखांचा समावेश असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरांमध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व वाढत चालले आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून परिमंडळ पाचकडे पाहिले जाते. परिमंडळमधील सात पोलीस ठाण्यातील 42 सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यतून हद्दपार करण्यात आले आहे.

pune police
Maharashtra Day: महाराष्ट्र दिनी मुंबईत सायकल रॅली, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणार उपक्रम

शेजारच्याच घरावर मारला डल्ला..

आर्थिक चणचण आणि आईच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांसाठी चक्क शेजाऱ्याचेच बंद घर फोडून लाखोंचे दागिने व रोकड चोरी करण्यात आल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याकडून सव्वा सात लाखांचे दागिने जप्त केले आहेत.

pune police
Mahrashtra Politics: फोन टॅपिंग प्रकरण दाबण्यासाठी ठाकरेंचं सरकार पाडलं? संजय राऊतांचा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com