Kalyan News: कल्याणमध्ये भर रस्त्यावर गावठी कट्ट्यासह फिरत होता सराईत गुन्हेगार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan Crime News: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 तारखेला होणार आहे. निवडणूकीचा प्रचार व निवडणूक रंगात आली असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले असून शहरात गस्ती वाढवल्या आहेत.
कल्याणमध्ये भर रस्त्यावर गावठी कट्ट्यासह फिरात होता सराईत गुन्हेगा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Kalyan Crime NewsSaam Tv

Kalyan Crime News:

>> अभिजित देशमुख

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 तारखेला होणार आहे. निवडणूकीचा प्रचार व निवडणूक रंगात आली असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले असून शहरात गस्ती वाढवल्या आहेत. पोलिसांच्या गस्ती दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात सापळा रचत पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्यात आहेत. केतन बोराडे, असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून गावठी कट्टा, एक मॅक्झिन, 3 जिवंत काडतूस जप्त केले आहेत. तपासादरम्यान केतन विरोधात याआधी देखील विविध पोलीस ठाण्यात वेग वेगळ्या प्रकारचे 21 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. केतनने हा कट्टा कुठून आणला, कशासाठी आणला, याआधी त्याने गावठी कट्टे विकले आहेत का? याचा तपास बाजारपेठ पोलीस करत आहे.

कल्याणमध्ये भर रस्त्यावर गावठी कट्ट्यासह फिरात होता सराईत गुन्हेगा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Maharashtra Politics: दादांची दमबाजी, सुप्रियाताईंची ढाल; निलेश लंकेसाठी सुळेंनी घेतला अजित पवारांशी पंगा, VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील राम मारुती चौकात एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती भाजपात पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नवनाथ रूपवते , अजिंक्य मोरे, पोलीस कर्मचारी सचिन साळवी, प्रेम बागुल यांच्या पथकाने राम मारुती चौक चौधरी मोहल्ला येथे सापळा रचला.

संशयस्पद रित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी थांबण्यास सांगितले, मात्र त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले. या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा, 1 मॅग्जीन, 3 जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला.

कल्याणमध्ये भर रस्त्यावर गावठी कट्ट्यासह फिरात होता सराईत गुन्हेगा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Amit Shah: मोदी ७५ वर्षांचे झाले तरी पंतप्रधान तेच राहती, अरविंद केजरीवालांना अमित शाह यांचे प्रत्युत्तर

केतन बोराडे हा वाडेघर पाडा येथील रहिवासी आहे. केतन सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत. केतनला पोलिसांनी अटक केली असून, त्याने आतापर्यंत असे गावठी कट्टे किती विकले? कुणाला विकले? हा कट्टा त्याने कुठून आणला, कशासाठी आणला होता, याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com