Kalyan Crime : कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार, खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतला जामीन

Kalyan News : कल्याण न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीचा जामीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवला असल्याचे समोर आल्यानंतर रद्द केला आहे. आरोपीवर अजामीन वॉरंट जारी करण्यात आले असून, खोट्या जामीनदारावरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
Crime
CrimeSaam tv
Published On

कल्याण मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कल्याण न्यायालयात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराने खोटी कागदपत्र जमा करत जामीन मिळवला असल्याचे उघडकीस आलॆ आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीने खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवल्याचे सिद्ध झाल्याने कल्याण न्यायालयाने संबंधित आरोपीचा जामीन रद्द करत त्याच्या विरोधात अजामीन पत्र वॉरंट जारी केला आहे . या प्रकरणातील फिर्यादीने तब्बल वर्षभरापूर्वी खोट्या जामीनाबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती . न्यायालयाच्या ही बाब निदर्शनास आणून देताच न्यायालयाने तत्काळ या आरोपीला चांगलाच दणका दिला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील आरोपी बलराज सिंग यांचा नातेवाईक हरियाणा मधील एक माजी मंत्री असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे २०२२ रोजी दिल्ली येथे आरोपी बलराज बलवंत सिंग यांच्याशी ओळख झाली होती .बलराज हा युट्युबर होता . पीडितेसोबत झालेल्या मैत्रीचा फायदा घेत बलराज सिंग याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत पिडितेने फेब्रुवारी २०२४ मध्ये केला. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती . दरम्यान बलराज याचा नातेवाईक हरियाणा येथील भाजपचा माजी मंत्री असल्याचे देखील माहिती आहे व याच राजकीय नेत्याच्या संपर्कातून त्याने हा गुन्हा दाखल न करण्यासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आल्याचा देखील आरोप पीडितेने केला होता.

Crime
Kalyan : कल्याणमध्ये मविआ महायुतीमध्ये सामना; १८ जागांसाठी मतदान, विजयाचा गुलाल कोण उधळणार ?

पोलिसांनी गुन्हा दाखल करत ९ एप्रिल २०२४ रोजी आरोपी बलराज बलवंत सिंग याला अटक केली मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिन्यांनी मे २०२४ मध्ये ५०,००० रुपयांच्या पी.आर. बॉण्डवर बलराजचा जामीन मंजूर झाला होता. त्याने फिरोज सलीम कुरेशी या व्यक्तीचा जामीनदार म्हणून दाखला दिला होता. मात्र पीडीतेला संशय आल्याने पीडितेने माहिती चा आधिकारात कागदपत्र मिळवले. हे कागदपत्रे खोटे असल्याचा तिला संशय आल्याने तिने याबाबत १७ जुलै २०२४ रोजी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करत माहितीच्या अधिकारात सर्व कागदपत्र खोटी असल्याचे पोलिसांना माहिती दिली . या पोलीस तपासा दरम्यान जामीनदाराने दिलेली कर भरणा पावती बनावट होती.

Crime
Kalyan RTO: कल्याण डोंबिवलीकरांचा रिक्षा प्रवास महागला, मीटर अन् शेअर रिक्षाचे भाडे वाढले; नवे दर काय?

आधारकार्डचा क्रमांक अमान्य असल्याचे निष्पन्न झाले.तसेच रेशन कार्डाचा फक्त एकच पान दिले गेल्याचे उघड झाले . या दरम्यान पीडिता स्वतः न्यायालयात दाद मागत होती . अखेर २६ जून रोजी या प्रकरणाची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी बलराज याचा जामीन तत्काळ रद्द केला तसेच आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्याने त्याच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले आहे. शिवाय खोट्या जामीनदाराच्या विरोधातही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . न्यायालयाच्या या निर्णयानंतर पीडितेने समाधान व्यक्त केलं असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com