Kalyan : कल्याणमध्ये मविआ महायुतीमध्ये सामना; १८ जागांसाठी मतदान, विजयाचा गुलाल कोण उधळणार ?

Kalyan Krushi Utpanna Bazar Samiti : कल्याणमध्ये कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मविआ आणि महायुतीमध्ये आज निवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर होणार.
Kalyan : कल्याणमध्ये मविआ महायुतीमध्ये सामना;  १८ जागांसाठी मतदान, विजयाचा गुलाल कोण उधळणार ?
kalyan krushi utpanna bazar samitisaam tv
Published On

कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीनंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांसाठी आज मतदानास सुरुवात झाली आहे. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळते आहे. एक जागा बिनविरोध झाल्याने उरलेल्या १७ जागांसाठी मतदान सुरू आहे.यामध्ये शेतकरी सेवा सोसायटी – ११ जागा, ग्रामपंचायत – ४ जागा, व्यापारी मतदार संघ – २ जागा, आणि हमाल/माथाडी गट – २ पैकी १ जागा बिनविरोध अशा प्रकारे विभागणी आहे.या निवडणुकीत एकूण १४० उमेदवार रिंगणात असून यंदा सत्तेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट लढत पाहायला मिळते आहे. आपले मत कुठे वळू नये यासाठी दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे.

Kalyan : कल्याणमध्ये मविआ महायुतीमध्ये सामना;  १८ जागांसाठी मतदान, विजयाचा गुलाल कोण उधळणार ?
Kalyan Crime : फळ विक्रीच्या आडून मोठा प्लॅन; ठाण्याच्या पोलीस पथकाकडून मोठी कारवाई

महायुतीचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी आत्मविश्वास व्यक्त करत म्हटलं, "अठराच्या अठरा जागा आम्ही जिंकणार, आमचा विजय निश्चित आहे. ही निवडणूक नाममात्र आहे." तर महाविकास आघाडीचे नेते म्हणाले की, "बाजार समितीच्या दुरवस्थेवर मतदार नाराज आहेत आणि या नाराजीचा फायदा आम्हाला मिळेल. आमचा विजय निश्चित आहे. असा विश्वास व्यक्त केला आहे.

Kalyan : कल्याणमध्ये मविआ महायुतीमध्ये सामना;  १८ जागांसाठी मतदान, विजयाचा गुलाल कोण उधळणार ?
Kalyan: वाईट नजर अन् मानसिक छळ, शिंदे गटाच्या नेत्याविरूद्ध दुसऱ्यांदा विनयभंगाचा गुन्हा; नेमकं घडलं काय?

या बाजार समितीवर सत्ता स्थापन कोणाची होणार? याचा निर्णय १७८० मतदारांच्या मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. मतमोजणी काही वेळातच सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने या निवडणुकीच्या निकालावर आता सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com