Parbhani News: आधी भावाला फोन केला, मग गळफास घेतला; जिंतूरमध्ये शिक्षकाच्या आत्महत्येने खळबळ

Teacher End Life By Hanging: परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात एका शिक्षकाने आपलं जीवन संपवलं आहे. परंतु आत्महत्या करण्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही.
Rahul Ubale
Rahul UbaleSaam Tv
Published On

Parbhani Crime News

परभणी (Parbhani) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे. त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आपण या घटनेबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

जिंतूर शहरातील संभाजीनगर भागात ही घटना घडली आहे. राहुल उबाळे (वय 36) असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. ही घटना शनिवारी (18 फेब्रुवारी) रोजी दुपारी घडली (Teacher End Life) आहे. राहुल उबाळे यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. आपलं जीवन संपवलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहत्या घरात गळफास घेतला

जिंतूर (Jintoor) शहरात एका 36 वर्षीय शिक्षकाने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी दोनच्या वाजेच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अष्पष्ट (Teacher End Life In Jintoor) आहे. राहुल उबाळे (वय 36) हे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवरून आपल्या भावाला माहिती दिली होती.

मोबाईलवरून त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचं भावाला सांगितलं. त्यानंतर शहरातील संभाजीनगर येथील राहत्या घरात गळफास घेतला. दरम्यान शेजाऱ्यांनी घरात पाहणी केली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी नातेवाईकांनी घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव (Parbhani News) घेतली.

Rahul Ubale
Kota Student End Life : कोटामध्ये आणखी NEET विद्यार्थ्याने जीवन संपवलं, वर्षभरातील आकडेवारी चिंताजनक

पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद

पोलिसांना राहुल उबाळे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित (Parbhani Crime) केलं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. परंतु उबाळे यांनी आत्महत्या करण्याचं कारण अद्याप अष्पष्ट आहे. जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये एका शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कर्जाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं (Parbhani Crime News) होतं. त्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवलं होतं. घटनास्थळी पोलिसांना सुसाई़ड नोट सापडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती.

Rahul Ubale
Husband End Life due to Wife : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून ३० वर्षीय पतीने जीवन संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com