Jalna Crime : चौथीही मुलगी झाल्यानं जन्मदात्यांनीच संपवलं, एका महिन्याच्या चिमुकलीला विहिरीत टाकलं; महाराष्ट्र हादरला

Jalna Crime : जालन्यात एक धक्कादायक तसेच संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी विहिरीत आढळून आला होता. अखेर या मृत्यूचा उलगडा झाला आहे.
Badnapur One month old girl murder
Badnapur One month old girl murderSaam Tv News
Published On

जालना : राज्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीय. अशीच एक धक्कादायक घटना जालन्यातून समोर आली आहे. चौथीही मुलगीच जन्माला आल्याने एका जन्मदात्या आई-वडिलांनीच एका महिन्याच्या चिमुकलीचा विहिरीत टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सतीश पवार आणि पूजा पवार असं संशयित आरोपी आई-वडिलांचं नाव आहे.

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावामध्ये १२ एप्रिल रोजी एका महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांना घातपाताची शंका होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली जिल्ह्यातील आशावर्करची मदत घेऊन पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. दरम्यान, पोलिसांनी आता संशयित आरोपी आई-वडिलांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Badnapur One month old girl murder
Swargate Bus Deopt Case: पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरण; दत्तात्रय गाडेविरुद्ध ८९३ पानांचं दोषारोपपत्र दाखल

अल्पवयीन मुलाचं डोकं सिमेंटच्या नाल्यावर आदळलं

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांमुळे संपूर्ण गावांमधील वातावरण ढवळून निघालं आहे. दिवसाढवळ्या बीडमध्ये हत्या, बंदुकीचा धाक दाखवून लूटमार, किरकोळ कारणावरून कोयत्याने वार, या कारणांमुळे बीड गुन्हेगारीच्या केंद्रस्थानी आलं आहे. अशातच बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुलाला उचलून आधी सिमेंटच्या नाल्यावर आदळले. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी अल्पवयीन मुलगा घटनास्थळावरुन फरार झाला आहे. आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

Badnapur One month old girl murder
Satara Crime : रस्ता तुझ्या बापाचा आहे का? On Duty पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण, कारण फक्त एवढंच...; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com