Nashik Crime : जन आरोग्य योजनेत भ्रष्टाचार; नाशकात २ खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

Nashik Crime : राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया केल्याच्या बदल्यात लाच मागितल्याने दोन खासगी डॉक्टरांवर नाशकात कारवाई करण्यात आलीय.
Nashik Crime Acb
Nashik Crime Acb
Published On

(तरबेज शेख, नाशिक)

Anti Corruption Bureau Arrested Two Doctors:

गरिबांना कमी पैशात वैद्यकीय उपचार मिळाव्यात यासाठी सरकारने राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडून डॉक्टर लाच मागत असल्याची घटना नाशकात उघड झालीय. दरम्यान या प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलीय. (Latest News)

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील तर २० हजारांची लाचेची मागणी डॉक्टरांकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आधी छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला होता. आता नाशिकमध्येही अशी घटना समोर आलीय. याप्रकरणात २ खासगी डॉक्टरांना अटक करण्यात आलीय. एसीबीने ही करावाई केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सापळा रचून कारवाई एसीबीची मोठी कारवाई

राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन खासगी डॉक्टरांनी ७ हजारांची लाच मागितली. लाचेच्या रक्कमेतून ७ हजार घेत असताना डॉक्टर महेश परदेशी आणि डॉक्टर महेश बुब यांना एसीबीने अटक केलीय. या प्रकरणात तक्रारदाराच्या आईच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सापळा रचला आणि डॉक्टरांना ताब्यात घेतलं. एसीबीची राज्यातील अशी पहिली कारवाई असावी, असं म्हटलं जात आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवर असलेल्या अल्पाईन हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेत उपचार घेण्यासाठी २० हजार रुपये लाच घेण्यात आली. हे स्टिंग ऑपरेशन खुद्द रुग्णांच्या नातेवाईकांनीच केलं होतं.

बुलढाण्यात सहा महिन्यात लाचखोरीच्या १२ कारवाई

बुलढाणा जिल्ह्यात मागील सहा महिन्यात एसीबी पथकांकडून झालेल्या १२ कारवायांवरून पाहण्यास मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात एसीबीच्या होत असलेल्या कारवाईवरून लाचखोरीचा आकडा समोर आला आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी एसीबीच्या उपअधीक्षक पदी शीतल घोगरे या रुजू झाल्यापासून एसीबी कारवाईचा आलेख वाढला आहे. आलेल्या तक्रारीवरून शीतल घोगरे यांनी मागील सहा महिन्यात १२ ट्रॅप केले.

Nashik Crime Acb
Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये काय चाललंय? भरवस्तीत दोघांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com