Nagpur Breaking News: धक्कादायक! कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; नागपुरात खळबळ

Nagpur Breaking News: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौऔद्योगिकी संस्था, नागपूरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारा विद्यार्थी हा मुळचा बिहारचा असून पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीमधून मोठा खुलासा झाला आहे.
Nagpur Breaking News: धक्कादायक! कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; नागपुरात खळबळ
Nagpur Crime NewsSaamtv

पराग ढोबळे, नागपूर|ता. ३० मे २०२४

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौऔद्योगिकी संस्था नागपूर येथे शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिव्यांशु गौतम असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा बिहारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौऔद्योगिकी संस्थेत शिकणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिव्यांशु गौतम असे या मुलाचे नाव असून कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच त्याने आपले आयुष्य संपवले. हॉस्टेलच्या रुममधून दुर्गंधी येत होती. ज्यानंतर दरवाजा उघडून पाहिल्यानंतर ही घटना समोर आली.

आत्महत्या केलेला विद्यार्थी बिहारचा असून तो काही पेपरमध्ये नापास झाला होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे? असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच ज्या रूममध्ये आत्महत्या केली त्यामध्ये एका रजिस्टरवर माझ्या मरणास कोणाला जबाबदार धरू नये, अशी नोट आढळून आल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nagpur Breaking News: धक्कादायक! कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; नागपुरात खळबळ
Nana Patole News: 'सध्या मुख्यमंत्री आहात याचे भान ठेवा', CM शिंदेंच्या व्हिडिओवरुन नाना पटोलेंचे टीकास्त्र!

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. तसेच विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. तसेच सापडलेली चिठ्ठी त्यानेच लिहिली आहे नाही याची शहानिशा केली जाईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nagpur Breaking News: धक्कादायक! कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; नागपुरात खळबळ
Chhagan Bhujbal News: 'त्यांनी माफी मागितली, भावना लक्षात घ्यायला हवी', छगन भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com