Mumbai : मित्राने धोका दिला... आधी बायकोला पटवले मग आश्रय देणाऱ्याचाच काटा काढला, बाईकवरून बॉडी घेऊन जाताना...

Mumbai Crime News : मुंबईत महिलेने प्रियकारच्या मदतीनेच नवऱ्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsAI Photo
Published On

Mumbai Crime News : व्हॅलेंटाईन वीक सुरू असतानाच मुंबईमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला. त्यानंतर पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पण पोलिसांच्या तपासात तिचं बिंग फुटले. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. मालवणी परिसरात ही सनसनाटी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने धारधार शस्त्राने नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण सीसीटीव्हीच्या आधाराने पोलिसांनी फक्त तीन तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिलेने नवरा राजेश दारू पिऊन सतत मारहाण करत असल्याचा दावा केलाय.

Mumbai Crime News
Crime : वहिनीला एकटं पाहून दीराचा संयम सुटला, बलात्कार केला अन्...

पत्नीचे अफेअर -

आरोपी महिलेचं नाव पूजा चव्हाण असे आहे. तिचे इमरान मंसूर याच्यासोबत अफेअर होतं. पूजा आणि इमरान यांनी दोन चिमुकल्या मुलांसमोरच राजेश याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा आणि मंसूर यांचं प्रेमसंबंध होतो. राजेशपासून सुटका मिळवण्यासाठी दोघांनी प्लॅन आखला. दोघांनी राजेशची हत्या केली अन् घरातील रक्ताचे डाग साफ केले. त्यानंतर राजेशच्या मृतदेहावर शॉल टाकली अन् रूग्णालयात घेऊन जात असल्याचे नाटक केले. पण अर्ध्या रस्त्यातच दोघेही घाबरले अन् मृतदेह फेकला. त्यानंतर पोलिसांत जाऊन राजेश बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

Mumbai Crime News
Crime News : मामीच्या प्रेमात भाचा वेडापिसा, नात्याची चाहूल मामाला लागली, दोघांनी काढला काटा

सीसीसीटीव्हीने बिंग फुटले

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात त्यांना धक्कादायक फुटेज दिसले. पूजा आणि मंसूर गाडीवर राजेशला घेऊन जात असल्याचे दिसते. त्यानंतर त्यांनी तात्काळ पूजा आणि मंसूरला ताब्यात घेत चौकशी सुरू झाली. पहिल्यांदा नाही नाही म्हणत होते, पण खाकी दाखवल्यानंतर सर्व काही सांगून टाकले.

Mumbai Crime News
Crime : 16 हजारांचा पगार अन् क्लर्ककडे बीएमडब्ल्यू कार, 16 लाखांचा गॉगल

मित्र म्हणून घरातच राहायला होता....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश मजूर म्हणून काम करत होता. मलाडमध्ये कुटुंबासोबत राहत होता. पत्नी, मुलगा अन् मुलगी असं छोटासं कुटुंब होतं. मंसूर कामासाठी मुंबईत आला, राजेशशिवाय त्याच्या ओळखीचे कुणी नव्हते. त्यामुळे राजेशने मंसूरला आपल्याच घरात राहायला परवानगी दिली.

इतकेच नाही तर राजेशने मंसूरसाठी कामही पाहिले होते. राजेशने मंसूरल रोजगार मिळवून दिला, पण मित्रानेच धोका दिला. मंसूर आणि राजेशची पत्नी पूजा यांच्यामध्ये प्रेम जडले. राजेश अडथळा ठरत होता, त्यामुळे त्याचा काटा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com