Mumbai Crime: अनोळखी नंबरवरून कॉल केला अन् फसला, ललित पाटील कसा अडकला मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Nashik Drugs Case: ललित पाटीलला न्यायालयात हजर केले असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam Digital
Published On

Mumbai Crime

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मुसक्या अखेर मुंबई साकीनाका पोलिसांनी आवळल्या आहेत. ड्रग साखळीतील त्याचे साथीदार त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. याच प्रयत्नातून ललित पाटील आयता पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. ललित पाटीलला न्यायालयात हजर केले असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईचे कायदा व सुव्यवस्था सहायक पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषद दिली.

नाशिक ड्रग्ज साठाप्रकरणी अनेकांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र पोलिसांनी अनेक नावं गुपित ठेवली होती. मीडिया रिपोर्ट वरून ललितचा असा समज झाला की त्याचे काही महत्त्वाचे साथीदार पोलिसांना चकवा देऊन पसार झाले आहेत. त्यामुळे त्याने एका अनोळखी नंबरवरून आपल्या एका साथीदाराला संपर्क केला. मात्र, तो साथीदार पोलिसांच्या कोठडीत असल्याने, ललित पाटीलचा हा अनोळखी नंबर पोलिसांच्या रडावर आला. अटकेत असलेल्या साथीदाराशी बोलताना, ललितला देखील त्याचा साथीदार पोलीस कोठडी असल्याचा संशय न आल्याने तो गाफील राहिला . दरम्यान पोलिसांनी ललित पाटीलचा अनोळखी नंबर ट्रेस करून बेंगलोर वरून चेन्नईला पळून जाताना त्याला अटक केली, अशी माहिती सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

Mumbai Crime
Uttar Pradesh News: मजुराच्या खात्यात आले २२१ कोटी, रातोरात झाला अरबपती, अन् आयकर विभागाची आली नोटीस

पंधरा दिवसांपूर्वी नाशिक ड्रग्ज प्रकरणात १४ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र ललित पाटील चकवा देऊन फरार झाला होता. या प्रकरणात ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या धाडीनंतर मुंबई पोलीस, नाशिक पोलीस आणि पुणे पोलीस ललित पाटीलच्या मागावर होते. मुंबईला ड्रग्ज फ्री करण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत ही कारवाई सुरू होती.

दरम्यान ललित पाटीलला न्यायालयात हजर केले असता त्याने आपण फरार झालो नव्हतो, आपल्याला पळवलं गेलं होतं आणि पुणे पोलिसांकडून आपल्याला धोका असल्याचा दावा केला आहे. माध्यमांसमोरही त्याने याबबाबत वक्तव्य केलं. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता असून या प्रकरणात अजून कोणाकोणाचा हात आहे. की राजकीय व्यक्तीचा वरदहस्त आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Mumbai Crime
Naxal Arrest: गडचिरोलीत एका जहाल नक्षलवाद्यास अटक; ६ लाख रुपयांचं होतं बक्षीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com