Mumbai News : महिलेसह दोघांवर चाकूने हल्ला; कारण ऐकून तळपायाची आग जाईल मस्तकात

Mumbai Crime News : मुलुंडच्या पश्चिमेकडील वैशालीनगर परिसरात रस्त्यावरील भटक्या श्वानाला मारहाण केली जात होती. यावेळी जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ३) घडली होती.
Mumbai News
Mumbai NewsSaam Digital
Published On

Mumbai News

मुलुंडच्या पश्चिमेकडील वैशालीनगर परिसरात रस्त्यावरील भटक्या श्वानाला मारहाण केली जात होती. यावेळी जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ३) घडली होती. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी दिनेश बोरेचा (वय ६०) याला अटक केली आहे. दरम्यान यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कांदिवली परिसरात वास्तव्यास असलेली ५० वर्षीय महिला तिच्या राहत्या इमारतीलगतच्या रस्त्यावर उभी होती. याच वेळी तिथून जाणाऱ्या दिनेश बोरेचा याने रस्त्यावरील भटक्या श्वानाला मारहाण केली. या महिलेने कुत्र्याला मारहाण करणाऱ्या बोरेचा याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि जाब विचारला होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा वाद एवढा विकोपाला गेला की बोरेचा याने खिशातील चाकू काढत महिलेवर हल्ला केला . यावेळी महिलेच्या बचावासाठी आलेल्या तिच्या नातेवाइकांवरही बोरेचाने चाकूने हल्ला केला. त्यात जखमी असलेल्या दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून पीडित महिला, आरोपी एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai News
Kolhapur News : खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू; ४ महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा

६ एप्रिलपर्यंत कोठडी

रागीट स्वभावाचा असलेल्या बोरेचा याने अनेकदा हिंसक कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी नेहमी चाकूसोबत ठेवत असल्याचे चौकशीदरम्यान त्याने कबूल केले. तसेच आरोपी मानसिक रुग्ण आहे. न्यायालयाने त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Mumbai News
CCTV Footage: बॅटने मारहाण करत भाजी विक्रेत्याची हत्या, पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com