Mumbai Crime: व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्समुळं सोनसाखळी चोर महिला अडकली जाळ्यात

Malad Crime News: व्हॉट्सअॅप अनेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झालं आहे. अनेकांना व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवण्याचीही सवय असते. मात्र व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवण्याच्या सवयीमुळे एक महिला थेट जेलमध्ये पोहोचली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam Tv

Mumbai News A House Help Thief Caught Due To Whatsapp Status :

व्हॉट्सअॅप अनेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झालं आहे. अनेकांना व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवण्याचीही सवय असते. मात्र व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवण्याच्या सवयीमुळे एक महिला थेट जेलमध्ये पोहोचली आहे. झालं असं की मुंबईतील मालाड परिसरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीचा उलगडा एका व्हॉट्सअॅप स्टेट्सवरुन झाला आहे.

मालाडमध्ये सुप्रिया जोशी यांच्या घरात सोन्याचे पेंडेट चोरी झाले होते. हे पेंडेट घरकाम करण्याऱ्या महिलेनेच चोरी केले होते. घरकाम करणाऱ्या महिलेच्या बहिणीने हे पेंडेट घालून व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवला होता. त्यामुळेच चोरी करणाऱ्या महिलेला पकडण्यात आले आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथे सुप्रिया जोशी त्यांच्या पती आणि मुलीसोबत राहत होत्या. त्यांच्या घरात सुनिता पिपलोडे (वय २३) घरकाम कराच्या. सुनिता ही डोबिंवलीला राहायची. ती एप्रिल २०२३ पासून सुप्रिया जोशींच्या घरी काम करायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात सुप्रिया यांची मुलगी प्रियंकाने तिच्याजवळ सोन्याची चैन आणि पेडंट मागितले होते. तेव्हा कपाटात पेंडट ठेवल्याचे त्यांनी सांगितले. परंतु प्रियंकाने पेडंट शोधले असता तिला ते मिळाले नाही. याबाबत आरोपी सुनिताचीदेखील चौकशी करण्यात आली. परंतु तिने पेडंट पाहिले नसल्याचे सांगितले.

Mumbai Crime News
Nagpur Crime News: भयंकर! डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमादिवशीच पतीची हत्या; नागपूर हादरलं

यानंतर १ फेब्रुवारीला सुनिताने काही वैयक्तिक कारण सांगून नोकरी सोडली. त्यानंतर २१ फेब्रुवारीला सुनिताची बहिण ललिताने सोन्याचे पेडंट घालून फोटो ठेवले होते. हे पेडंट जोशी यांच्या घरातून चोरीला गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्याच एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिस सध्या या महिलेचा तपास घेत आहेत.

Mumbai Crime News
Kolhapur Crime News: धक्कादायक! जिममध्ये घातक औषधांची विक्री; दोघांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com