Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलिसाची निर्घृण हत्या, बायको अन् मुलाकडून जीव जाईपर्यंत मारहाण नंतर...

Mumbai Police: मुंबईत पोलिस कॉन्स्टेबलची बायको आणि मुलाने हत्या केली. आर्थिक वादातून ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.
Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलिसाची निर्घृण हत्या, बायको अन् मुलाकडून जीव जाईपर्यंत मारहाण नंतर...
Mumbai CrimeSaam Tv
Published On

मुंबईमध्ये पोलिस कॉन्स्टेबलची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादात बायको आणि मुलाने या पोलिसाला बेदम मारहाण केली. या मारहणीत पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांच्या बायको आणि मुलाला बुधवारी अटक करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती पण शवविच्छेदन अहवालात अनैसर्गिक मृत्यूची चिन्हे आढळून आली. तसंच पोलिसाच्या नातेवाईकांनी त्याची बायको आणि मुलाने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलिसाची निर्घृण हत्या, बायको अन् मुलाकडून जीव जाईपर्यंत मारहाण नंतर...
Crime: ४ बहिणींवर बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपीकडून मेहुण्याची हत्या, मृतदेह घराजवळ पुरला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ सप्टेंबर रोजी घडली. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले प्रवीण सूर्यवंशी (५२ वर्षे) हे सायनमधील प्रतीक्षा नगर येथील पोलिस क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान, प्रवीण यांचा भाऊ आणि इतर नातेवाईकांनी आरोप केला की त्याचा मृत्यू अपघाती नाही. त्यानी प्रवीण यांची बायको स्मिता सूर्यवंशी(४२ वर्षे) आणि मुलगा प्रतीक (२२ वर्षे) यांच्याबाबत संशय व्यक्त केला. कारण प्रवीण यांचे बायको आणि मुलासोबत दीर्घकाळापासून आर्थिक वाद सुरू होता.

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलिसाची निर्घृण हत्या, बायको अन् मुलाकडून जीव जाईपर्यंत मारहाण नंतर...
Kalyan Crime : नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, 'त्या' व्हिडीओमुळे ८ जणांच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड

मृत पोलिसाच्या शवविच्छेदन अहवालातून देखील धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसाच्या शरीरावर ३८ जखमा होत्या. जास्त रक्तस्त्राव आणि धक्क्यामुळे त्याचा अनैसर्गिक मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले. पुढील तपासात असे दिसून आले की ज्या दिवशी कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्याची बायको आणि मुलगा शिवाजी नगर पोलिस स्टेशनबाहेर त्याना भेटले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी त्याच्यावर हल्ला केला.

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलिसाची निर्घृण हत्या, बायको अन् मुलाकडून जीव जाईपर्यंत मारहाण नंतर...
Crime: आधी दारू पाजली, बिर्याणीही खाऊ घातली; नंतर महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केल्याने जागीच संपवलं

पोलिसांनी सांगितले की, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण यांनी नाशिक आणि कल्याणमधील त्याच्या मालमत्ता त्याच्या नातेवाईकांना हस्तांतरित केल्या होत्या आणि त्याच्या खर्चासाठी त्यांचे एटीएम कार्ड त्यांच्या भावाला दिले होते. ज्यामुळे त्याची बायको आणि मुलगा नाराज झाला असावा. यातूनच त्यांनी प्रवीण यांची हत्या केली. बायको आणि मुलाने प्रवीण यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना खिडकीवर ढकलून दिले. ज्यामुळे खिडकीची काच फुटली आणि त्यांच्या शरीरावर खोलवर जखमा झाल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलिसाची निर्घृण हत्या, बायको अन् मुलाकडून जीव जाईपर्यंत मारहाण नंतर...
Jogeshwari Crime: जोगेश्वरी पोलीसांची मोठी कामगिरी; सराईत आरोपींना अटक, सहा गुन्हे उघडकीस

प्रवीण यांच्यावर हल्ल्यानंतर त्याची बायको आणि मुलगा त्यांना गंभीर जखमी अवस्थेत तिथेच सोडून निघून गेले. काही तासांनंतर प्रवीण यांचे नातेवाईक त्यांच्या घरी आले. तेव्हा त्यांना प्रवीण गंभीर जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांनी प्रवीण यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे प्रवीण यांचा मृत्यू झाला. वेळेत उपचार मिळाले असते तर ते वाचू शकले असते असे डॉक्टरांनी सांगतिले.

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलिसाची निर्घृण हत्या, बायको अन् मुलाकडून जीव जाईपर्यंत मारहाण नंतर...
Kopargaon Crime : कोपरगाव शहरात दोन गटात राडा; रात्रीच्या सुमारास दगडफेक व हाणामारी, ६३ जणांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com