Kashimira Police : शाब्बास काशीमिरा पोलीस! गहाळ झालेले १०२ मोबाईल नागरिकांना केले परत

Kashimira Police Latest News : गेल्या सहा महिन्यांपासून या मोबाईल फोनच्या कामात पोलिसांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावून तक्रारदारांना परत दिले. फोन परत देताना तक्रारदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
Kashimira Police
Kashimira Police Saam tv
Published On

महेंद्र वानखेडे, मिरा भाईंदर

Kashimira Police Latest News :

मिरा भाईंदरमधील काशीमिरा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काशीमिरा पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले १०२ फोन पोलिसांनी हस्तगत करून तक्रारदारांना परत दिले. गेल्या सहा महिन्यांपासून या मोबाईल फोनच्या कामात पोलिसांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावून तक्रारदारांना परत दिले. फोन परत देताना तक्रारदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. (Latest Marathi News)

मिरा भाईंदर शहरात मोबाईल हरवल्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोबाईल फोन प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक झाला आहे. एखादा फोन हरवला की, सदर व्यक्ती फोन शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो.

कारण,त्याची वैयक्तिक माहिती,बँक खात्याची माहिती, इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश मोबाईल फोनमध्ये असतात. त्यामुळे मोबाईल फोन हा एक महत्वाचा घटक बनला आहे. हाच मोबाईल फोन हरविल्याने नागरिकांचा गोंधळ उडतो. त्यानंतर तातडीने मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसांत पोहोचतो.

Kashimira Police
Dhule Crime News : जैन मंदिरातील तिजोरी चाेरणाऱ्या तिघांना अटक, धुळे एलसीबीची कारवाई

पोलीस ठाण्यात किंवा ऑनलाइन तक्रार दिल्यानंतर, बहुतांश तक्रारदारांना मोबाईल मिळेल ही आशा नसते. खरंतर मोबाईल फोन शोधणं पोलिसांना समोर एक आव्हानच असतं. त्यात चोरी झालेले मोबाईल फोन तर थेट बिहार,झारखंड,नेपाळमध्ये गेल्याने फोन मिळणे, तितकेसे शक्य होत नाही. त्यामुळे पोलिसांना तांत्रिकदृष्ट्या तपास करून गहाळ झालेले फोन मिळवण्यात थोडेफार यश मिळते. तर अनेक प्रमाणिक जागरूक नागरिक देखील स्वतः मिळालेले फोन स्थानिक पोलिस ठाण्यात जमा करतात, असे पाहायला मिळाले आहे.

Kashimira Police
Pandharpur Crime News : पंढरपुरात पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

काशीमिरा गुन्हे प्रकटीकरण शाखेने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे आणि त्यांच्या टीमने एक-दोन नव्हे तर तब्बल १०२ फोन हस्तगत करण्यात यश आले आहे. या कामगिरीचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी देखील कौतुक केले. शनिवारी काशीमिरा पोलिस ठाण्यात गहाळ झालेले १०२ फोन पोलिसांनी तक्रारदार यांना परत दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com