Crime News: भारतात राहायचे की पाकिस्तानात?, वाद विकोपाला गेला; पाकिस्तानी बायकोची हत्या करून नवऱ्याची आत्महत्या

Kharghar Crime: नवी मुंबईच्या खारघरमध्ये नवऱ्याने पाकिस्तानी बायकोची हत्या केली. नंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या केली. या घटनेमुळे खारघरमध्ये खळबळ उडाली होती. आता या हत्या आणि आत्महत्येमागचं कारण समोर आलं आहे.
Crime News: भारतात राहायचे की पाकिस्तानात?, वाद विकोपाला गेला; पाकिस्तानी पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
Kharghar Crime News Saam Tv
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतील्या खारघरमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बायकोवर चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली होती. त्यानंतर नवऱ्याने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली होती. आता या हत्या आणि आत्महत्या प्रकरणाचं खरं कारण तपासातून समोर आलं आहे.

खारघरमध्ये पाकिस्तानी महिलेची तिच्या नवऱ्याने चाकूने वार करून हत्या केली होती. त्यानंतर या व्यक्तीने चाकूने स्वतःवर वार करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी समोर घडली होती. दोघेही पती-पत्नी हिंदू होते. मूळ पाकिस्तानमध्ये राहणारे नोतनदास सचदेव (40 वर्षे) आणि त्यांची पाकिस्तानी नागरिक असलेली पत्नी सपना सचदेव (35 वर्षे) दोन मुलांसोबत गेल्या सहा महिन्यांपूर्वी भारतात आले होते.खारघरमधील डॉलफिन प्राईड, सेक्टर ३४ ए येथील एका फ्लॅटमध्ये हे नवरा-बायको आपल्या मुलांसोबत राहत होते.

Crime News: भारतात राहायचे की पाकिस्तानात?, वाद विकोपाला गेला; पाकिस्तानी पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
Kharghar Crime : खारघर हादरलं! पत्नीची हत्या करुन पतीने स्वत:लाही संपवलं, कारण...

सपनाला पुन्हा पाकमध्ये जायचे होते आणि नोतनदास मात्र भारतात राहण्यास इच्छुक होता. भारतात राहायचे की पाकिस्तानात? यावरून दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते. यावरून दोघांमध्ये सोमवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या नोतनदासने सपनावर चाकूने अनेक वार करुन तिची निर्घृण हत्या केली. सपनाच्या गळ्यावर, शरीरावर अनेक वार करण्यात आले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सपनाचा जागीच मृत्यू झाला.

Crime News: भारतात राहायचे की पाकिस्तानात?, वाद विकोपाला गेला; पाकिस्तानी पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
Crime : ६ वर्षांच्या मुलीवर निर्घृण बलात्कार, आवाज दाबण्यासाठी तोंडात कोंबली पाने, नंतर दगडाने मारले

बायकोच्या हत्येनंतर नोतनदासने स्वत:च्या गळ्यावर देखील चाकू फिरवला आणि आत्महत्या केली. त्याचा देखील जागीच मृत्यू झाला. सपनाच्या भावाच्या फिर्यादीनंतर खारघर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून घेत तपास सुरू केला होता. या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेमुळे खारघर हादरले.

Crime News: भारतात राहायचे की पाकिस्तानात?, वाद विकोपाला गेला; पाकिस्तानी पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
Crime News: शेतीसाठी सख्खा भाव पक्का वैरी झाला, तलवारीने सपासप वार करत धाकट्याने थोरल्याचा जीव घेतला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com