Kalyan Crime News: प्रसादाचं आमिष दाखवून 7 वर्षांच्या चिमुकलीसोबत भयंकर कृत्य; घटनेनं कल्याण हादरलं

Crime News: या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे मुलगी घाबरली तिने घडलेला प्रकार घरी कुटुंबीयांना सांगितला.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam TV
Published On

अभिजित देशमुख

Kalyan:

कल्याणमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रसादाचे आमिष दाखवत घरी बोलावत एका नराधमाने ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय. ही संतापजनक घटना कल्याण पूर्व परिसरात घडलीये. रामलखन असे या नराधामचे नाव असून कोळशेवाडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Kalyan Crime News
Uttar Pradeh Crime News: भयंकर घटना! महिलेला विवस्त्रावस्थेत धावत्या ट्रेनमधून गंगा नदीत फेकलं

सात वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. यावेळी शेजारी राहणारा रामलखन मुलीजवळ आला. रामलखन त्याच परिसरात राहणारा असल्याने मुलगी रामलखन याला ओळखत होती. ओळखीचा फायदा घेत रामलखने मुलीला मी तुला प्रसाद खायला देतो असे सागत घरी नेले. घरात नेऊन मुलीवर त्याने अत्याचार केला.

या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे मुलगी घाबरली तिने घडलेला प्रकार घरी कुटुंबीयांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी रामलखनला अटक केली आहे.

आरोपी व्यक्ती हमालीचे काम करतो. तो घरात एकटाच राहतो. पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रामलखन याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी हेमंत ढोले करत आहेत.

Kalyan Crime News
Punjab Crime: पंजाबमध्ये डीएसपींची गोळ्या झाडून हत्या, रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह; परिसरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com