
मुंबईतील एका 30 वर्षीय महिलेने जेएसडब्लूचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. जिंदाल यांनी रविवारी हे आरोप फेटाळून लावले. आपण तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
महिलेच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ती अभिनेत्री असल्याचं सांगण्यात आलं आहे. महिलेने असा दावा केला की, ती काही वर्षांपूर्वी दुबई येथे एका क्रिकेट सामन्यात जिंदालयांना भेटली होती, त्यानंतर त्यांची मैत्री झाली. महिलेच्या म्हणण्यानुसार, नंतर सज्जन जिंदाल तिच्याकडे आकर्षित झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महिलेने दावा केला आहे की, या वर्षी 23 जानेवारी रोजी जेएसडब्ल्यू ग्रुपच्या मुख्यालयात कथित तिचा लैंगिक छळ झाला होता. जिंदाल यांनी तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे तिने सांगितले. तिने 16 फेब्रुवारी रोजी पोलिसांशी संपर्क साधला आणि 13 डिसेंबर रोजी मुंबईतील बीकेसी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार), 354 (महिलेच्या प्रतिष्ठेला अपमानित करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. (Latest Marathi News)
यानंतर रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात जिंदाल यांनी हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. जिंदाल यांनी जारी केलेल्या वैयक्तिक निवेदनात असे म्हटले आहे की, ते तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. तपास चालू असल्याने आम्ही यावर अधिक भाष्य करू शकत नाही.
दरम्यान, दुबई स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये जिंदाल यांना पहिल्यांदा भेटल्याचा दावा महिलेने केला आहे, जिथे त्यांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली. तिने दावा केला आहे की, ती नंतर जिंदालला वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये आणि दक्षिण मुंबईतील जिंदाल मॅन्शनमध्ये भेटली होती आणि. तसेच लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप करण्यापूर्वी कारमध्ये त्याच्यासोबत फिरायला गेली होती. एफआयआरमध्ये तिने नमूद केले आहे की, कथित लैंगिक छळानंतर जिंदाल तिच्याशी संपर्क करण्याचे टाळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.