Hyderabad News : वर्गात वाढदिवस साजरा केला म्हणून शिक्षक ओरडले; १९ वर्षीय तरूणीने उचललं टोकाचं पाऊल

Girl Student Ends Life : वर्गात वाढदिवस साजरा केल्यामुळे शिक्षक रागावले. त्यामुळे एका १९ वर्षीय तरूणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने विषारी औषध पिऊन करून जीवन संपवलं. तेलंगणात ही घटना घडली.
Girl Ends Life in Telangana
Girl Ends Life in TelanganaSaam Tv

End Life By Consuming Pesticide

तेलगंणामधील भूपालपल्ली येथे एका १९ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना ((Girl End Life) घडली आहे. भूपालपल्ली येथे एका १९ वर्षीय तरुणीने शुक्रवारी (२२ मार्च) राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.  (latest marathi news)

बी वैष्णवी असं मृत तरूणीचं नाव आहे. ती कलवपल्ली येथील रहिवासी (Hyderabad News) आहे. तिने मंचेरियल येथे पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. वैष्णवीने नुकताच तिचा वाढदिवस वर्गात मित्रांसोबत साजरा केला होता. त्यामुळे तिला शिक्षकांनी फटकारलं (Teacher Scold) होतं. १७ मार्च रोजी वैष्णवी कॉलेजमधून घरी परतली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आईवडील कामावर गेल्यानंतर घरी एकटीच असलेल्या वैष्णवीने शुक्रवारी जीवन संपवण्याच्या उद्देशाने कीटकनाशक प्राशन केलं होतं. तिचे वडिल घरी परतल्यानंतर त्यांना वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत (Girl End Life By Consuming Pesticide) आढळली. त्यांनी तातडीने वैष्णवीला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना वैष्णवीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे वैष्णवीच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तरूणांच्या आत्महत्येच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. आता तेलंगाणामधेही अशीच घटना घडली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून तरूण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं समोर येत आहे. वैष्णवीने विषारी औषध प्राशन करून तिचं जीवन संपवल्याची घटना भूपालपल्ली (Bhupalpally) येथून समोर आली आहे.

Girl Ends Life in Telangana
Suicide: जवाबदार मुलगा, भाऊ न होवू शकल्‍याची सुसाइड नोट; तरूणाची मामाच्‍या घरी आत्‍महत्‍या

मुंबईमधील घटना

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून ४३ वर्षीय महिलेने उडी घेत आत्महत्या केली होती. ही महिला डॉक्टर असल्याची माहिती समोर आली होती. किंजल शाह असं या महिलेचं नाव (End Life) होतं. ही महिला टॅक्सीने अटल सेतूवर आली होती. फोटो काढायचा आहे, असं सांगून तिने टॅक्सी थांबवली. त्यानंतर टॅक्सीमधून उतरून अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली.

टॅक्सी चालकाने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही महिला मागील काही वर्षांपासून नैराश्यात असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत किंजलने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली (mumbai news) आहे. यामध्ये किंजलने अटल सेतूवरून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

Girl Ends Life in Telangana
World Suicide Prevention Day 2023 : कोणत्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com