Husband Kidnap Wife: बायको रुसली, पतीला करमेना; भर रस्त्यातून पत्नीचं अपहरण करणाऱ्या नवरोबाला अखेर जेलवारी

Shocking Abduction: पत्नी सासरी नांदायला येत नाही म्हणून भर रस्त्यातून पत्नीचे अपहरण करणे नवऱ्याला चांगलंच महागात पडलंय. पोलिसांची पत्नीची सुटका केली. मात्र जेलवारी करण्याची वेळ नवरोबावर आलीय. पाहूया एक रिपोर्ट.पत्नीचं अपहरण नवरोबाला जेलवारी
nashik kidnapped
nashik kidnapped Saam Tv
Published On

सीसीटीव्ही मधील ही दृश्य पहा... हे कुठल्या सिनेमातील दृश्य नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या पांगरी गावातील आहेत. आई सोबत पायी जाणाऱ्या मुलीला सिनेस्टाईल पद्धतीने अपहरण करून घेऊन जाणारा दुसरा-तिसरा कोणी नसून चक्क त्या मुलीचा पती आहे.

नक्की काय प्रकार आहे ते पाहूया...

वैभव पवार या युवकाने जानेवारीत गावातीलच एका १९ वर्षीय मुलीशी प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये वाद झाल्यानं पत्नी पुन्हा माहेरी निघून गेली. पत्नी नांदायला सासरी येत नसल्याच्या रागातून नवऱ्याने चक्क मित्रांच्या मदतीने बायकोच्या अपहरणाचाच कट रचला. पत्नी आईसोबत रस्त्याने पायी जात असताना नवऱ्याने कारमधून येत बायकोला पळवून नेलं. यावेळी जावयाने सासूलाही मारहाण केली. भररस्त्यातील या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला.

nashik kidnapped
Onion Export Duty: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; 20 टक्के निर्यात शुल्क हटवला, केंद्र सरकारचा निर्णय

घटनेचा गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली. अपहरण करणाऱ्या नवऱ्याच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन शिर्डी बस स्थानकाच्या परिसरात ट्रेस झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने शिर्डी घाटात पत्नीची सुटका करत नवरोबाला अटक केली. पीडित पत्नीच्या फिर्यादीनंतर वावी पोलीस ठाण्यात नवऱ्यासह त्याच्या साथीदारांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

nashik kidnapped
Beed News: माझ्या नवऱ्याला वाचवा! वाल्मिक कराडपासून जिवाला धोका, अश्विनी खिंडकरची कारागृह अधीक्षकांकडे कळकळीची विनंती

न्यायालयाने पतीला ३ दिवसांची कोठडी सुनावलीय. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. दुसरीकडे पती-पत्नीतील वाद हे सामंजस्यानं सुटायला हवेत. वेळप्रसंगी समुपदेशनाची देखील मदत घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com