Shocking News: भयंकर! तिघे दुचाकीवरून आले, शाळकरी मुलीचं अपहरण केलं; नदीकाठावर नेलं अन्...

Odisha Crime: दुचाकीवरून आलेल्या तिघांनी घराकडे निघालेल्या मुलीचं अपहरण केलं. तिला जबरदस्ती नदीकाठावर नेलं. हात-पाय बांधून तिला पेटवून दिलं. या घटनेने ओडिशामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.
Shocking News: भयंकर! तिघे दुचाकीवरून आले, शाळकरी मुलीचं अपहरण केलं; नदीकाठावर नेलं अन्...
Odisha CrimeSaam Tv
Published On

ओडिशात एक हृदयद्रावक घटना घडली. ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून तिला पेटवून दिलं. ही मुलगी ७५ टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. रविवारी तिला उपचारासाठी विमानाने दिल्लीला हलवण्यात आले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात या मुलीवर उपचार सुरू आहेत.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दुक्ष्यश्याम सेनापती नावाच्या एका व्यक्तीच्या घरापर्यंत ही मुलगी जळालेल्या अवस्थेत पळत आली. ही मुलगी मला वाचवा मला वाचवा अशी विनंती करत होती. या मुलीला दुक्ष्यश्याम सेनापती यांनी रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याच्या घरात घडलेल्या या वेदनादायक ९० मिनिटांच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितले की, 'मुलगी जळत होती आणि ती वेदनेने ओरडत होती.'

Shocking News: भयंकर! तिघे दुचाकीवरून आले, शाळकरी मुलीचं अपहरण केलं; नदीकाठावर नेलं अन्...
Beed Crime: महादेव मुंडे हत्या प्रकरणाला २० महिने; मानेचा तुकडा मिसिंग असल्याची धक्कादायक माहिती मेडिकल रिपोर्टमधून उघड|VIDEO

सेनापती यांनी सांगितले की, तीन पुरूषांनी पीडित मुलीचे हात बांधले आणि तिला जाळून टाकले. मुलगी शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास त्याच्या घरी पोहोचली आणि मला वाचवा, मला वाचवा अशी ओरडू लागली. मी आणि माझ्या पत्नीने लगेच मुलीची आग विझवली आणि तिला खूप तहान लागली असल्याने तिला पाणी दिले. त्यानंतर माझ्या कुटुंबातील महिलांनी तिचे कपडे बदलले.'

Shocking News: भयंकर! तिघे दुचाकीवरून आले, शाळकरी मुलीचं अपहरण केलं; नदीकाठावर नेलं अन्...
Amravati Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध धंदे; पोलिसांची छापेमारी, ३ इसमांसह सहा तरुणी ताब्यात

सेनापती यांच्या म्हणण्यानुसार, मुलीने त्यांना सांगितले की एका मित्राला भेटून ती घरी परतत असताना ३ अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण केले. ते तिघेही दुचाकीवरून आले होते आणि त्यांनी चेहऱ्याला रुमाल बांधले होते. अपरहण करून त्यांनी तिला भार्गवी नदीच्या काठावर नेले. त्यांनी तिचा चेहरा रुमालाने झाकला, तिचे हात बांधले आणि तिच्यावर काही ज्वलनशील पदार्थ ओतले आणि तिला पेटवून दिले. त्यानंतर ही मुलगी वाचवा वाचवा अशी ओरडत माझ्या घरापर्यंत पोहचली. पीडित मुलीने सेनापती यांना तिच्या वडिलांचे नाव आणि गावाचे नाव सांगितले त्यानंतर त्यांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करत त्यांना घटनेची माहिती दिली. मुलगी जेव्हा सेनापती यांच्या घरी आली तेव्हा तिचे हात मोकळे होते. १५ वर्षांच्या मुलीला पेटवून देत हल्लेखोर पळून गेले.

Shocking News: भयंकर! तिघे दुचाकीवरून आले, शाळकरी मुलीचं अपहरण केलं; नदीकाठावर नेलं अन्...
Akola Crime : आधी मंगळसूत्र चोरलं, नंतर परत देत चोरट्यांनी महिलेला माफी मागितली; नेमकं काय घडलं?

सेनापती यांनी पोलिसांना सांगितले की, हल्लेखोर मुलीला जाळल्यानंतर लगेच पळून गेले कदाचित त्यांना वाटले असेल की ती वाचणार नाही. १०८ रुग्णवाहिका उशिरा आली, तोपर्यंत ते तिला ऑटोरिक्षात घेऊन जाण्याच्या तयारीत होते. मुलगी सुमारे ९० मिनिटे आमच्या घरात राहिली. या घटनेमुळे गावात दहशत पसरली आहे. आमची मुले एकटी बाहेर जाण्यास घाबरत आहेत. गुन्हेगारांना त्वरित अटक करा. अशी आमची मागणी आहे.

मुलीला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. नंतर भुवनेश्वर एम्समध्ये आणि शेवटी रविवारी दुपारी ४.२० वाजता तिला नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. मुलगी ७५ टक्के भाजलेली आहे. तिला सध्या एम्स रुग्णालयातील बर्न्स अँड प्लास्टिक सर्जरी ब्लॉकच्या बर्न्स आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे आणि तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Shocking News: भयंकर! तिघे दुचाकीवरून आले, शाळकरी मुलीचं अपहरण केलं; नदीकाठावर नेलं अन्...
Pachora Crime : झोपेतच पत्नीचा गळा चिरला; चारित्र्याच्या संशयातून पतीचे भयानक कृत्य, नंतर केला आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com