Naxalist Arrested: ६ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या महिला नक्षलवाद्याला अटक

Gadchiroli Crime News: गडचिरोली पोलीस दलाने टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर महिला नक्षलवाद्याला अटक केलीय. या महिला नक्षलवाद्याच्या डोक्यावर ६ लाख रुपयांचे बक्षिस घोषित करण्यात आले होते.
Naxalist
Naxalist Saam Tv

(मंगेश भांडेकर,गडचिरोली)

Gadchiroli Police Force Arrested Naxalist Woman :

सहा लाख रुपये बक्षीस असलेल्या एका जहाल महिला नक्षलवाद्याला गडचिरोली पोलीस दलाने अटक केलीय. केडमारा आणि कचलाराम जंगलातील केलेल्या चकमकीत या महिला नक्षलवाद्याचा सहभाग होता. (Latest News)

गडचिरोली पोलीस दलाने टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केलीय. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा, (वय ३० वर्षे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. राजेश्वरी ऊर्फ कमला ही छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात असलेल्या भोपालपट्टनम तालुक्यातील बडा काकलेर गावातील रहिवाशी होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील वर्षी एप्रिल २०२३ मध्ये केडमारा जंगल परिसरात झालेल्या चकमकीसाठी तसेच पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग असून तिच्यावर चकमकीचे ४ गुन्हे दाखल होते.

नागनडोह जंगलात स्फोटकांच्या बॅगसह नक्षलवाद्याला अटक

नक्षलवाद्यांकरीता स्फोटके घेवून जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला गोंदिया पोलिसांच्या नक्षली सेलने अटक केली मागील एप्रिल महिन्यात अटक केली होती. या प्रकरणी किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (वय 31, रा. खारकाडी, पोस्ट- हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन केशारी अंतर्गत नागनडोह जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. गोंदिया जिल्हा पोलीस पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. भरनोली लगतच्या नागनडोह जंगल परिसरात घनदाट जंगलात एक इसम हा पोलिसाविरुध्द घातपाती विध्वंसक कारवाई करण्याचे दृष्टीने माओवादी- नक्षलवादी यांना स्फोटके आणि इतर साहित्य देण्याकरिता जंगल मार्गाने जाणार आहे.

नक्षलवाद्यांचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने स्फोटके घेवून जाणार असलेल्या व्यक्तीला जेरबंद करण्याच्यादृष्टीने नागनडोह जंगल परिसरात सापळा रचून घनदाट जंगल परिसरात संशयीतरित्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग घेवून जात असताना एका इसमास ताब्यात घेतल होतं. त्या बागेत 1 डेटोनेटर, 1 जिलेटीनची कांडी असे स्फोटके साहित्य मिळून आले.

Naxalist
Gadchiroli, Chhattisgarh Naxalite: छत्तीसगड सीमेवर जहाल नक्षलवाद्याला अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com