Crime News : लग्नाची वरात निघाली, अचानक नवरदेवाच्या कारवर चढवला हल्ला; नव्या नवरीसोबत घडलं भयंकर

MP News : लग्नाची वरात अडवून गुंड नवरीला पळवून नेतात असे अनेक हिंदी चित्रपटामध्ये पाहायला मिळते. अशीच घटना खरोखर घडली आहे. नवऱ्याच्या कारवर हल्ला करुन गुंडांनी नवरीचे अपहरण केले आहे.
MP Crime News
MP Crime NewsSaam Tv
Published On

Crime : लग्नाची वरात निघाली होती, वाटेत गुंड आले आणि नवरीला पळवून घेऊन गेले.. असे सीन्स अनेक जुन्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. असा प्रकार खऱ्या आयुष्यामध्ये घडला आहे. मध्यप्रदेशमधल्या गुना जिल्ह्यामध्ये गुंडांनी वरातीमध्ये घुसून नवरीला पळवून नेले. या प्रकरणी वरवधुच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सवाई माधोपुरहून नवऱ्यासह वरात मध्यप्रदेशला गेली होती. लग्न झाल्यानंतर वरवधु आणि सर्व कुटुंबीय परत राजस्थानला परतत होते. लग्न ज्या ठिकाणी झाले तेथून १०० किलोमीटरवर वरात पोहोचल्यावर त्यांच्यावर गुंडांनी हल्ला केला. गुंडांनी नव्या नवरीला पळवून नेले. ही घटना गुना जिल्ह्यातला देहरी गावाजवळ घडली.

नवरीचे अपहरण केल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींसह पोलिसांनी नवरीला देखील ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपींना नवरी ओळखत असल्याचा पोलिसांना संशय आहे. ज्यावेळेस नवरीचे अपहरण झाले तेव्हा ती गुंडांना नावाने हाक माकरत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

MP Crime News
Pune Swargate ST Depot Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट, सगळं सत्य समोर येणार

दरम्यान अपहरण झालेल्या नवरीबद्दल अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. नवरीचे वय १९ वर्ष आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये दोनदा तिचे अपहरण झाले आहे. २०२३ मध्ये तिचे अपहरण झाले होते. त्यानंतर मार्च महिन्यात गुंडांनी तिला पळवून नेले होते. या माहितीवरुन अपहरणामागे प्रेमसंबंध हा मुद्दा असू शकतो असा पोलिसांना संशय आहे.

MP Crime News
Pune Swargate ST Depot Case : ना ओळख, ना कुठला व्यवहार, पसरत असलेले नरेटीव्ह दत्ता गाडेच्या वकिलाने काढले खोडून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com