Crime : कौटुंबिक वाद टोकाला पोहोचला, सावत्र मुलीसमोर नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य; बस स्टँडवर काय घडलं?

Crime News : एका व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत बस स्टँडवर भांडण सुरु होते. रागाच्या भरात त्याने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. जीवघेण्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
crime
crimex
Published On

Shocking : बस स्टँडवर एका ३२ वर्षीय महिलेची तिच्या पतीने चाकूने वार करून हत्या केली. ही महिला तिच्या १३ वर्षीय मुलीसह बस स्टँडवर असताना ही भयानक घटना घडली. अल्पवयीन मुलगी ही या घटनेची प्रत्यक्षदर्शी आहे. मृत महिला आणि आरोपी यांचे ३ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. हे त्यांचे दुसरे लग्न होते. ही महिला कॉल सेंटरमध्ये काम करत असे, तर आरोपी हा कॅब ड्रायव्हर आहे. ही भयावह घटना बंगळुरूच्या सुनकडकट्टे बस स्टँडवर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव रेखा आणि आरोपीचे नाव लोहितश्व असे आहे. दीड वर्षांपूर्वी दोघे मित्रांमुळे एकमेकांना भेटले, त्यांनी काही महिन्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर त्यांच्यात भांडण व्हायला सुरूवात झाली. या भांडणामुळेच रेखाचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. रेखा आणि लोहितश्व भाड्याच्या घरात राहत होते. पहिल्या लग्नापासून रेखाला दोन मुली होत्या. तिची मोठी मुलगी तिच्यासोबत राहत होती.

crime
Kalyan Crime : कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ८ जणांवर गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं?

रेखा आणि लोहितश्वा यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर ती रागारागात तिच्या १३ वर्षीय मुलीसह घराबाहेर पडली आणि बस स्टँडवर गेली. लोहितश्वा तिच्या मागे गेला. दोघांमध्ये बस स्टँडवर पुन्हा भांडण झाले. रेखाच्या मुलीने भांडणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात लोहितश्वाने चाकूने रेखाच्या छातीवर आणि पोटावर अनेक वार केले. हल्ल्यात रेखा बस स्टँडवरच मरण पावली.

crime
ED Raid : आपच्या महत्वाच्या नेत्याला मोठा धक्का! कोट्यवधींची मालमत्ता जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई होणार?

रेखावर हल्ला होत असताना आसपासच्या लोकांनी लोहितश्वाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चाकूचा धाक दाखवत त्या लोकांना धमकावले. त्यानंतर तो बस स्टँडवरुन पळून गेला. रेखाच्या मुलीने संपूर्ण घटना पाहिली. जवळच्या पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहितश्वा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

crime
Video : तिरुपती मंदिरात १०० कोटींच्या चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा, CCTV फुटेजमध्ये चोरी करताना दिसला अधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com