Sambhajinagar Crime News : 50 हजार रुपयांसाठी युवकाचे अपहरण, पोलिसांच्या तत्परतेने पुण्यातील दाेघे गजाआड

Chhatrapati Sambhajinagar Latest Marathi News : हे दाेघे पुण्याचे रहिवासी आहेत. या प्रकरणी या दोघांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.
sambhajinagar cidco police arrests two youth from pune
sambhajinagar cidco police arrests two youth from puneSaam Digital

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

मित्राला महिन्याभरापूर्वी उसने दिलेले 50 हजार रुपये तो परत करीत नसल्यामुळे दोघांनी पुण्याहून येऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील मिसारवाडी भागातून मित्राच्या लहान भावाचे अपहरण केल्याची घटना घडली हाेती. या घटनेची नाेंद पाेलिसांत हाेताच सिडकाे पाेलिसांनी सापळा रचत दाेघांना ताब्यात घेतले. (Maharashtra News)

सिडको पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार सचिन अनिल टाकळकर असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव होते. ही घटना घडल्यानंतर अपहरणकर्ते पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत हाेते. अपहरणकर्त्यांचा सिडको पोलिसांनी पाठलाग करुन अवघ्या तीन तासांत 2 संशयित आरोपींना नगर जवळ ताब्यात घेतले.

sambhajinagar cidco police arrests two youth from pune
King cobra Rescued In Dodamarg: झोळंबेत आढळला साडे अकरा फुटांचा 'किंग कोब्रा'

श्रीकांत भाऊसाहेब आईवळे आणि किरण दशरथ शिंदे अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे दाेघे पुण्याचे रहिवासी आहेत. या प्रकरणी या दोघांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

sambhajinagar cidco police arrests two youth from pune
Transgender Wedding : चर्चा आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याची; युवकाने तृतीयपंथीयाशी बांधली गाठ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com