Bike Thief: दुचाकी चोराला बेड्या ठोकण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश; ४ दुचाकीसह गुंगीचं औषध जप्त

Chalisgaon Crime : धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली होती. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन दुचाकी चोरीची तक्रार देण्यात आली होती. त्याचा तपास करत पोलिसांनी चोराला बेड्या ठोकल्या आहेत.
Chalisgaon Crime
Chalisgaon Crime Saam tv
Published On

(भूषण अहिरे, धुळे)

Chalisgaon Crime :

चाळीसगाव रोड पोलिसांना दुचाकी चोराला पकडण्यात यश आले आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी गेल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी एका संशंयिताला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याकडे आणखी तीन मोटरसायकल पोलिसांना चोरीच्या मिळून आल्या. (Latest News)

पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्धात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून पोलिसांना जवळपास कोरेकच्या २० बाटल्या मिळाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दुचाकी चोरीला गेली होती. त्याची तक्रार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात आलेली होती, या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतल्यानंतर या चोरीचा पदार्फाश झालाय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नऊ दुचाकीसह चोरी करणारी टोळी ताब्यात

धुळे शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याचा शोध पोलिसांकडून सुरु होता. या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या गुरुद्वारा परिसरामध्ये पुलाखाली काही संशयित चोरटे हे काही दुचाकीसह उभे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास मिळाली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.

Chalisgaon Crime
Akola Crime : तोतयांची चालबाजी; पोलीस असल्याचं भासवत दुचाकी पळवली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com