Akola: पोपटखेड धरण पाहताना घडला अनर्थ, तरुणांची कार थेट पाण्यात बुडाली

Akola Latest Marathi News : अकोट तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेलं पोपटखेड धरण. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने धरण पहण्यासाठी येत असतात.
car drowned in popatkhed dam near akola no casualties recorded
car drowned in popatkhed dam near akola no casualties recordedSaam Digital

- अक्षय गवळी

पोपटखेड़ धरण पाहण्यासाठी आलेल्या हौशी तरुणांची कार थेट धरणात बुडाली आहे. धरणाच्या परिसरातील भिंतीवर कार उभी करून तरुण धरण पाहण्यासाठी गेले असता, अचानक कार हळूहळू धरणाच्या उताराच्या दिशेने खाली जाऊन पाण्यात बुडाली. सुदैवाने कार धरणात बुडाली तेव्हा कारमध्ये कोणी नव्हते. (Maharashtra News)

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या सातपुडा पायथ्याशी पोपटखेड़ धरण आहे. अकोट शहरातील काही तरुण कार घेऊन पोपटखेड धरण पाहण्यासाठी गेले होते. कारमधील तरुण धरण पाहण्यासाठी उतरल्यानंतर परिसराच्या भिंतीवर उभी असलेली कार अचानक धरणातील पाण्यात गेली.

car drowned in popatkhed dam near akola no casualties recorded
Social Media मधील मैत्रीने केला घात, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दाेघांना अटक

वीर एकलव्य बचाव पथकानं आपल्या चमूसह धरणात बुडालेली कार ओढून बाहेर काढली. दरम्यान अकोट तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेलं पोपटखेड धरण. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने धरण पहण्यासाठी येत असतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या धरणावर कोणीही सुरक्षारक्षक नसतो. त्यामुळे पर्यटक त्यांची वाहने थेट भिंतीवर घेऊन जातात. यापूर्वी या ठिकाणी अनेक दुचाकी भिंतीवरून धरणात घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या. म्हणून आता या ठिकाणी सुरक्षेचा उपाय करण्याची मागणी होतेय.

Edited By : Siddharth Latkar

car drowned in popatkhed dam near akola no casualties recorded
Sambhajinagar: पाणीप्रश्न पेटला! वैजापूर तालुक्यातील 5 गावांतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com