Crime News: जुन्नर हादरलं! अनैतिक संबंधाच्या रागातून दुचाकीस्वाराला कारने चिरडले, तरूणाचा जागीच मृत्यू

Car Crushed Bike Rider: अनैतिक संबंधाच्या रागातून दुचाकीस्वाराला कारने चिरडल्याची घटना जुन्नरमध्ये घडली आहे. या घटनेला अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Car Crushed Bike Rider
Car Crushed Bike RiderYandex

रोहिदास गाडगे साम टीव्ही, जुन्नर

पुण्यातील (Pune) जुन्नर तालुक्यामध्ये दुचाकीस्वाराला कारने चिरडल्याची घटना घडली आहे. अनैतिक संबधातुन हा प्रकार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेला अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला (Crime News) आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

जुन्नर (Junnar) तालुक्यात अनैतिक संबंधातुन एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये अपघात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे नाशिक महामार्गाजवळ ही धक्कादायक घटना घडली (Car Crushed Bike Rider) आहे. शाबिर कुरेशी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. त्यालाच कारने चिरडल्याची घटना घडलेली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय पोलीस तपास करत आहेत.

Car Crushed Bike Rider
Pune Cyber Crime : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख पडली महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाख रुपयांत फसवणूक

पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल समोर शाबिर कुरेशी हा (Pune Crime) व्यक्ती त्याच्या दुचाकीवर बसलेला होता. तेव्हा पाठीमागून एक कार भारधाव वेगाने आली. अन् या भरधाव वेगातील कारने दुचाकीस्वाराला जागीच चिरडले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आहे. ही घटना बघताना अपघात झाला ( Marathi Crime News) असल्याचं दिसत आहे.

या प्रकरणी आरोपी अभिजित सोनवने याला नारायणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातुन बदला घेण्यासाठी केल्याचा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला (Youth Death) आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. अनैतिक संबंधाच्या कारणामुळे आपण अनेकदा हत्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना (Pune Crime News) ऐकतो, जुन्नरमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे.

Car Crushed Bike Rider
Crime News: सोशल मीडियावर मैत्री, हॉटेलात नेऊन तरुणीवर अत्याचार; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com