Crime News : एक दिवसाआधी लग्नाच्या बंधनात अडकली, दुसऱ्या दिवशी नवऱ्यासमोर बायकोचं अपहरण; कारमध्ये टाकून पळवून नेलं

Crime : मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी वधूचं पतीसमोरच अपहरण करण्यात आलं.
Bride Kidnapped After Wedding
Bride Kidnapped After Weddingsamm tv
Published On

मध्य प्रदेश पोलिसांनी रविवारी एका महिलेचं अपहरण केल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक केली. ही महिला तिच्या पतीसोबत राजस्थानातील सवाई माधोपूर येथील तिच्या माहेरी जात असताना, शनिवारी रात्री तिचे अपहरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, या महिलेचं एक दिवसाआधीच लग्न झालं होतं.

उपविभागीय पोलिस अधिकारी SDOP दीपा दुडवे यांनी सांगितले की, गुना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४६ वरील रुथियाई परिसरात रविवारी सकाळी ९:३० वाजता एक घटना घडली. आरोपींनी चाकूचा वापर करून कारच्या काचा फोडल्या, आणि वधूवर हल्ला केला. त्यानंतर, त्यांनी वधूला एका मोठ्या कारमध्ये टाकून पळून गेले.

Bride Kidnapped After Wedding
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरात खळबळ! २० जणांचे टोळके आले, किराणा दुकानात गेले, पुढे घडले ते भयंकर

नंतर दीपा दुडवे यांनी सांगितलं की, माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने वधूची सुटका केली आणि सात आरोपींपैकी पाच जणांना अटक केली. चार जणांना इंदूरमधून आणि एकाला देवासमधून अटक करण्यात आली. सर्व आरोपी वीस वर्षांचे आहेत आणि देवासचे रहिवासी आहेत. यातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत.

या घटनेत सहभागी असलेल्या मुख्य आरोपीचं नाव आकाश बंजारा आहे. त्याच्याकडून एक काळी स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे, जी घटनेत वापरली गेली होती. पोलीस सध्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Edited By - Purva Palande

Bride Kidnapped After Wedding
Pune Crime : पुण्यात पोलिसावरच जीवघेणा हल्ला, गोळीबार अन् कोयत्याने वार, कायदा-सुव्यस्था वाऱ्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com