Thane Bribe News : आरोपीला मदत करणे भोवलं, ५ लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षक ACBच्या जाळ्यात

ACB Action In Thane : आरोपीला मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने अधिकाऱ्याला अटक केलीय.
ACB Action In Thane
ACB Action In ThaneThane Police
Published On

(हिरा ढाकणे)

ACB Arrested Assistant Inspector of Police in Bribe Case :

अँटी करप्शन ब्युरोने नारपोली पोलीस स्टेशन भिवंडी मोठी कारवाई करत लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडलं आहे. अटकेत असलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आरोपीच्या कुटुबीयांकडे लाच मागितली होती. आरोपीला सर्व प्रकारे मदत करण्यासाठी तपास करणारे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत लाचखोर पोलीस निरीक्षकाला अटक केलीय. (Latest News)

शरद बबन पवार,असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. दरम्यान याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार एका महिलेने केली होती. तक्रारदाराचा मुलगा कलम ३०२ अंतर्गत अटकेत आहे. सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी लोकसेवक सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार हे होते. अटकेत असलेल्या आरोपीला सर्व प्रकारे मदत करतो. चार्जशीट पाठविताना सुद्धा मदत करतो, असे सांगून त्यांनी पंचासमक्ष तक्रारदार महिलेकडे ५ लाख रुपयांची मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिलेने तक्रार दिल्यानंतर मंगळवारी लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी सापळा रचत लाचखोर अधिकाऱ्याला अटक केली. पोलिसांनी या अधिकाऱ्याला नारपोली पोलीस स्टेशन येथे त्यांचे केबिनमध्ये पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधवी राजेकुंभार ठाणे याच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला. या पथकात सहाय्यक फौजदार एस.आर.खान, पोलीस हवालदार एम.ए.बजागे महाराष्ट्र पोलीस हवालदार एम.ए. तेटंबे, सहाय्यक फौजदार चौधरी (चालक) हे होते.

तक्रारदार महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधवी राजेकुंभार यांच्या नेतृत्त्वाखाली एक टीम तयार करणयात आली. या पथकात सहाय्यक फौजदार एस.आर.खान,पोलीस हवालदार एम.ए.बजागे महाराष्ट्र पोलीस हवालदार एम.ए. तेटंबे, सहाय्यक फौजदार चौधरी यांचा समावेश होता.

पोलीस उपअधीक्षकांनी नारपोली पोलीस स्टेशन येथे सापळा रचला. लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या केबिन लाचलुचपत विभागाचे अधिकाऱ्याना तेथे बसवलं होतं. तक्रार महिलेने लाचखोर अधिकाऱ्याच्या मागणीनुसार रुपये २ लाख रुपये दिले. महिलेने दिलेले २ लाख रुपये घेतानाच लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बबन पवार याला रंगेहात पकडले.

ACB Action In Thane
Pune Crime : पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात टाकला दरोडा, लोणी काळभोरमधील कर्मचाऱ्यांचा प्रताप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com