Akola News : दिल्लीतील तरुणीवर अकोल्यात सलग ३ वर्ष अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

Akola Crime News : दिल्लीतल्या एका 31 वर्षीय तरुणीवर अकोला शहरात अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 3 वर्षापासून पीडित तरुणीवर अत्याचार सुरू होता.
Akola News
Akola News Saam Digital

अक्षय गवळी

Akola News

दिल्लीतल्या एका 31 वर्षीय तरुणीवर अकोला शहरात अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 3 वर्षापासून पीडित तरुणीवर अत्याचार सुरू होता, अखेर तरुणीने पोलीस स्टेशन गाठलं. तरुणीच्या यासंदर्भात रामदास पेठ पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मोहसीन इब्राहिम सूर्या (वय 35) असं आरोपीचं नाव आहे. मोहसीनने शहरातीलच एका नामांकित हॉटेलमध्ये पीड़ित तरुणीला नेत तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असं पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.

दिल्लीतील ही तरुणी 3 वर्षांपूर्वी मुंबईला काही कामानिमित्त गेली होती, अनेक दिवस तिने मुंबईत मुक्काम केलाय. या दरम्यान ओळख अकोल्यातल्या मोहसीनशी झाली. या दरम्यान दोघांच्या भेटी-गाठी वाढल्या, आणि दोघांची चांगली मैत्री झाली. कालांतरानं त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल. दोघांनी सुरुवातीला काही दिवस प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्याचवेळी मोहसीनने तिला लग्नाचं वचन दिलं.

त्यानंतर त्यांने तिला तिला अकोल्यात आणलं आणि शहरातल्या एका नामांकित हॉटेलमध्ये तिला मुक्कामी ठेवलं. इथं तिच्यावर त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केलं. त्यानंतर पीड़ित तरुणी दिल्लीला घरी परतली. पुढं काही महिन्यानंतर पुन्हा त्याने तिला अकोल्यात बोलावलं. पढे हे प्रकार असेच सुरूच राहिले.

Akola News
Mumbai Airport : १.४६ कोटीचं सोनं लपवलं होतं कपड्यांमध्ये; मुंबई विमानतळावर फुटलं बिंग

तब्बल 3 वर्ष दोघेही रिलेशनशिप'मध्ये राहिले, पुढं तिने मोहसीकडे लग्नाची मागणी घातली. अनेकदा त्याने लग्नासाठी टाळाटाळ केली. काही महिने त्यांच्याकडून टाळाटाळ सुरू होती. अखेर त्याने तिला स्पष्टच नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. लागलीच तिने रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठल, त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोहसीनंविरुद्ध लग्नाच आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून अनेकदा अत्याचार केल्याच्या आरोपावरून 376, 376(2N), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मोहसीन फरार असून पोलीस त्याच्या शोध घेतायेत.

Akola News
Kalyan Crime News : महाराष्ट्रासह तेलंगणात घरफोडी दोघे गजाआड, कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com