कृषीनगरातील गॅंगवॉर प्रकरणात १७ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई
टोळीप्रमुख शुभम हिवाळेसह अनेक गुन्ह्यांत सहभागी आरोपींना न्यायालयीन कोठडी
पोलिसांनी शस्त्रे व काडतुसे जप्त करून पुढील तपास सुरू केला
अकोल्यात गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई
अक्षय गवळी, अकोला
अकोल्यातील गुन्हेगारी क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यातील कृषी नगरमध्ये झालेल्या गॅंगवॉर प्रकरणातील १७ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत (MOCCA) कारवाई करण्यात आली आहे. वर्चस्वाच्या लढाईसाठी झालेल्या गॅंगवॉरमध्ये बंदूकीसह तलवारी, लोखंडी पाईप, कु-हाड, फरशी तसेच धारदार शस्त्राचा वापर झाला होता. घटनास्थळावरून काही काडतूस, तसेच जिवंत काडतूस जप्त केल्या होत्या.
अकोल्यातल्या सिव्हिल लाईन स्टेशन सिव्हील लाईन हद्दीतील कृषीनगरमध्ये दोन गटात जुन्या वादातून मोठा गॅंगवॉर झाला होता. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांत २४९/२०२५ कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), २९६, ११५(२), ११८(१), ११८(२), १०९, १२५ भारतीय न्याय संहिता सह कलम ३/२५, ४/२५ शस्त्र अधिनियम व सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमा अंतर्गत टोळीप्रमुखासह १७ गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, दाखल झालेल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचे मागील १० वर्षाचे अभिलेख तपासण्यात आले. त्यानुसार टोळीप्रमुख शुभम विजय हिवाळे आणि इतर सदस्य स्वप्नील प्रविण बागळे, आकाश सुनिल गवई, शंतनु गोपाल तायडे, अनिकेत उर्फ मल्हार विनोद गवई, धम्मपाल उर्फ धम्मा शामराव तायडे, अनिकेत दिपक सावळे, निखील उर्फ बंटी भिमराव चराटे, आकाश उर्फ दादु पुरुषोत्तम खडसे, ऋषिकेश नरेंद्र तायडे, आदित्य उर्फ मामा प्रेमदास कांबळे, विवेक उर्फ विक्की नरेंद्र तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच प्रज्वल राजेश अरखराव, राज रमेश डोळे, अभिजीत उर्फ डॉन विश्वनाथ वैरागड, सागर विलास कांबळे आणि एका अल्पवयीन मुलावर साधी व गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रांनी हल्ले करणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगा, बेकायदेशीर जमाव जमविणे, शस्त्रसज्ज दंगा करणे, अश्लील शिवीगाळ करणे तसेच बेकायदेशीररीत्या शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणे असे गुन्हे केलेले आहेत. यातील बहुतेक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असुन गेल्या दहा वर्षांत त्यांच्या विरोधात विविध प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल झाले.
यातील टोळीचा प्रमुख शुभम हिवाळे हा नेहमी वेगवेगळ्या गुन्हेगारांना हाताशी धरुन टोळी तयार करुन गुन्हे करत असल्याचे मागील दोषारोप पत्रावरुन स्पष्ट झाले. त्यानुसार हे कृत्य मकोका कायदयाअंतर्गत संघटित गुन्ह्यात मोडत असल्यामुळे नमुद आरोपी टोळीप्रमुख व टोळीतील सदस्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षकाडे पाठवला.
पुढे गुन्हयात कलम ३(१) (ii), कलम ३(२) व कलम ३(४) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ वाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. व सदर गुन्हयाचा पुढील तपास हा उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला हे करत आहे. यासाठी अधिक परिश्रम अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलीस शाखेचे प्रमुख शंकर शेळके, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मालती कायटे यांनी घेतले.
दरम्यान, अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहून शांतता राहावी, यासाठी अशा प्रकारचे टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे गुन्हेगारांवर मकोका कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याची चेतावणी अर्थातच इशारा आहे. त्यामुळे यापुढे कोणीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्यास गुन्हेगारांवर मकोका, एमपीडीए, अशा योग्य, त्या कारवाई करण्यात येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.