Akola Crime: संशयित आरोपी मृत्यूप्रकरण: 'त्या' नॉटरेचेबल असलेल्या ५ पोलिसांवरही बदलीची कारवाई

Akola Crime Suspicious accused death case : एका गुन्ह्याच्या तपासात संशयित आरोपीला केलेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आलीय. याप्रकरणातील काही पोलीस कर्मचारी नॉट रिचेबल होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
Akola Crime: संशयित आरोपी मृत्यूप्रकरण:  'त्या' नॉटरेचेबल असलेल्या ५ पोलिसांवरही बदलीची कारवाई
Akola Crime Suspicious accused death case Saam Tv

अक्षय गवळी

अकोला : आता बातमी साम'नं दाखवलेल्या बातमीच्या दणक्याची. अकोल्यात पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीचं मृत्यू प्रकरण अकोला पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांहून जास्त काळ दडपून ठेवले होतं. अखेर, 'साम'नं हे प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. आता या प्रकरणात आणखी मोठी अपडेट समोर आलीय.

अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपण कोल्हेंच्या बदलीनंतर आता नॉटरिचेबल असलेल्या तब्बल ५ पोलिसांवर बदलीची कारवाई करण्यात आलीये. पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी ही बदलीची कारवाई केली आहे. तर संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. ठाणेदार कोल्हे यांना कंट्रोल रुमला. तर पाच पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस हेडकॉटर अटॅच मध्ये बदली करण्यात आलीय. दरम्यान जानेवारी महिन्यात गोवर्धन हरमकार या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

त्यानंतर या प्रकरणातील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारावाईचा बडगा उगारण्यात आलाय. या प्रकरणात आतापर्यत पीएसआय राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके असे एकत्रित ४ पोलिसांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. सध्यास्थित पीएसआय राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळुंके हे अटकेत आहेत. दरम्यान याप्रकरणी गुन्हे दाखल झाले तेव्हापासून अकोट पोलीस ठाण्यातील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव हे नॉटरीचेबल होते. आता यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आलीय.

आतापर्यत अकोट पोलिसांवर झालेली कारवाई

गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणात आतापर्यत चार पोलिसांवर खुणाचे गुन्हे दाखल.

PSI राजेश जवरेसह, पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके अटकेत. तर दोन अज्ञात पोलीस कर्मचारी फरार.

अकोटच्या ठाणेदारावर तपण कोल्हे यांच्यावर बदली कारवाई. चौकशीत अडथळा ठरू नये, म्हणून.

मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील आता बदलीची मोठी कारवाई.

Akola Crime: संशयित आरोपी मृत्यूप्रकरण:  'त्या' नॉटरेचेबल असलेल्या ५ पोलिसांवरही बदलीची कारवाई
Akola News: संशयित आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदाराची बदली, PSIसह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com