Akola News: पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू? नातेवाईकांचा गंभीर आरोप; पीएसआयचं निलंबन

Akot News: अकोला जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. गुह्यातील आरोपाखाली संशयित आरोपी म्हणून अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय.
Akola News
Akola NewsSaam Tv

Akola Crime News:

>> अक्षय गवळी

अकोला जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. गुह्यातील आरोपाखाली संशयित आरोपी म्हणून अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय. यादरम्यान पोलिसांकडून त्याला अमानुषपणे मारहाण झाली, त्याच्या गुदद्वारात दांडा टाकून मारहाण झाली. या मारहाणीत त्याच्या छातीची हाडं तुटलीत आणि त्यात 'तो' गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलावत खाजगी रुग्णालयात दाखल केलंय. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झालाय, असा आरोप आहे.

'गोवर्धन हरमकार' असं या मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव. विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र, नातेवाईकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली, आणि या प्रकरणात आता चौकशी समिती बसली. दरम्यान सद्यस्थितीत या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकाचं (PSI) आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांच निलंबन झालेत.

Akola News
Salman Khan Firing: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचे फोटो आले समोर, पोलिसांकडून शोध सुरू

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील 'PSI राजेश जवरे' आणि इतर 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पूतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर 16 जानेवारीला सुकळी गावात आणत घर झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना काहीच हाती लागलं नाहीये. पुढ, पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलंय. त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती, एवढ्यावरच न थांबता... त्याच्या गुदद्वारात दांडा टाकून त्याला मारहाण केल्याचं गंभीर कृत्य केलं. या मारहाणीत छातीची हाडं तूटलीत. यात गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तिच्या मदतीनं पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं.

गोवर्धनची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोल्यात न्यायचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला अकोल्यातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.आणि मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला उपचार दरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तूटली होती, असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केलाय. दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी काही बाहेरील व्यक्ती आपल्याला धमकावत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद नाहीये. गोवर्धना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण गरजेचं होतं. पण इथं तसं झालं नाहीये. असेही तक्रारीत म्हटलंय.

Akola News
Pune Fraud News: पृथ्वीवरुन थेट स्वर्गात जागा देतो.. नामांकित डॉक्टरची तब्बल ६ कोटींची फसवणूक; पुण्यात खळबळ

शवविच्छेदनात वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासे

गोवर्धन याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण आतापर्यंत समजू शकल नाही. मात्र प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. अशी माहिती आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी साम'शी बोलताना दिली. दरम्यान स्थानिक पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गंभीर भूमिका घेतली नाही. अखेर कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली. आता या प्रकरणात चौकशी समिती गठित झाली आणि पुढील चौकशी पोलीस करताहेत.

PSI'सह एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन

या प्रकरणात आरोप असलेल्या पोलीस अधिकारी म्हणजेच 'PSI राजेश जवरे' आणि पोलीस कर्मचारी 'सोळुंके' या दोघांचं निलंबन झाले. दरम्यान वैद्यकीय अहवालानूसार मृतक गोवर्धन याच्या अंगावर जखमा अन् मारहाणीमूळ मृत्यु झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळ आपल्या गैरवर्तनाच्या संशयावरुन दोघांनाही निलंबित करण्यात येत, असे आदेशात नमुद आहे. पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी हे आदेश काढले. विशेष म्हणजे अकोटचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक अहवाल तयार केलाय. आणि तो अहवाल वरिष्ठांना पाठविला, अशी माहिती त्यांनी दिली आहे. परंतु तपासात नेमकं काय आहे, यावर त्यांनी बोलायला टाळलं.

या प्रश्नांच्या उत्तर पोलिस शोधतील का?

मृत गोवर्धनला कोणत्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं? नेमकं पोलिस ठाण्यात काय घडलं? वैद्यकीय अहवालात नेमकं काय समोर येणार?, पोलिसांकडून माहिती द्यायला टाळाटाळ का केली जातंय?, कुटुंबियांना धमक्या देणारे 'ते' व्यक्ती कोण? कुटुंबियांचे आरोप कितपत सत्य? यासह अन्य प्रश्नांची उत्तरं अकोला पोलिसांना शोधावी लागणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com