Ahmednagar: आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू ; होळीच्या दिवशीच नगर हादरलं

Ahmednagar Fire News : घराला आग लागल्याने त्याचां मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच परिसरात महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवल्याची चर्चा आहे.
Ahmednagar
AhmednagarSaam TV

Fire News :

नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे दोन मुलींसह आईचा मृत झाला आहे. घराला आग लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच परिसरात महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवल्याची चर्चा आहे. नेमकं काय घडलं याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Ahmednagar
Nashik Bus Fire : नाशिकमध्ये धावत्या एसटी बसने घेतला अचानक पेट; प्रवासी सुखरुप

मिळालेल्या माहितीनुसार, लीलाबाई सुनील लांडगे असं मृत आईचं नाव आहे. तर साक्षी आणि खुशी अशी दोन्ही मृत मुलींची नावे आहेत. पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने तेथे धाव घेतली.

होळीच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. हिंगोलीच्या वसमत शहरालगत असलेल्या हळदीच्या एका मोठ्या गोडाऊनमध्ये सकाळी आग लागली होती. अचानक गोडाऊनमधून धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केल्याने ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच आग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वेळीच यंत्रणा पोहचल्याने आगीवर देखील नियंत्रण मिळवता आले आहे.

Ahmednagar
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! अलीपूरमध्ये कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे ३४ बंब घटनास्थळी, थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com