Ahmednagar Crime News: पत्नीच्या माहेरकडील मालमत्तेचा वाद; वकील दाम्पत्याचं आधी अपहरण मग हत्या, राहुरीत नक्की काय घडलं?

Advocate Couple Death Rahuri : राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या वकील दाम्पत्याचं अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली आहे. वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव असं हत्या झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे.
Ahmednagar Crime
Ahmednagar Crime Saam Tv
Published On

Ahmednagar Crime Advocate Couple Death

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतेय. मालमत्तेच्या वादातून अपहरण झाल्याच्या, खूनाच्या घटना देखील घडत आहे. अशीच एक घटना राहुरीतून समोर आलीय. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (latest crime news)

राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा हे दोघे गुरूवारी दुपारपासून न्यायालय परिसरातून बेपत्ता झाले होते. यामुळं वकील संघटना आणि राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली (Advocate Couple Death Rahuri) होती. वकील आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर लगेच त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. राहुरी वकील संघटनेचे अध्यक्ष ऋषीकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तपास करण्याची मागणी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आढाव दाम्पत्य बेपत्ता

आढाव वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्तीत राहते. ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. राजाराम आढाव गुरूवारी दुपारपर्यंत न्यायालयात कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ते नगरला गेले होते. एका पक्षकाराला पाठवून त्यांनी पत्नी मनीषाला बोलावून घेतलं होतं, अशी माहिती मिळतेय. तेव्हापासूनच आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली (Advocate Couple Death Rahuri) होती.

आढाव यांची गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात उभी होती. राहुरी पोलीस मध्यरात्री गस्त घालत होते, तेव्हा त्यांना आढाव यांची कार न्यायालयाच्या आवारात उभी आढळली होती. राहुरी पोलीस तिची तपासणी करत होते, तेव्हा तिथे न्यायालयाच्या आवारात आणखी एक कार आली. पण, पोलिसांना पाहताच ती कार तिथून भरधाव वेगात निघून गेली.

Ahmednagar Crime
Heart Blockage Led Death : 90 टक्के हार्ट ब्लॉकमुळे त्या मॅरेथॉनपटूचा मृत्यू, डॉक्टरांनी नेमका काय सल्ला दिला?

आढाव दाम्पत्याची हत्या

पोलिस निरीक्षक ठेंगेंनी आढावांच्या कारची तपासणी केली. यात त्यांना एक हातमोजा, दोर, मोबाईलचे कव्हर आणि एक बूट आढळून (Advocate Couple Death) आला. पोलिसांनी न्यायालय परिसरात पुन्हा तपासणी केली. तेव्हा त्यांना आढावांची दुचाकी न्यायालयाच्या मागील बाजूला आढळली. आढाव यांचं एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँकेसमोर सापडलं. यावरून त्यांचं अपहरण झाल्याचा संशय बळावला, तसं तपासात समोर आलंय. गुन्हे शोध पथकाने पोलिसांना पाहून निघून गेलेल्या कारचा शोध घेतला. यात त्यांनी तिन संशयितांना ताब्यात घेतलं.

पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा या तिघांनी आढाव दाम्पत्याबरोबर केलेल्या घटनेची माहिती दिली. आढाव दाम्पत्याची अगोदर हत्या केली. त्यानंतर त्यांना (Rahuri) राहुरीतील उंबरे गावातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या बारवमध्ये मोठ्या दगडाला बांधून टाकलं, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्या बारवमधील पाणी उपसलं अन् आढाव दाम्पत्यांचे मृतदेह बाहेर (Ahmednagar Crime) काढले. या हत्येत आणखी दोन जण संशयितांची नावं समोर येत आहेत. परंतु ते दोघे पसार झाले आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय. मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून हत्या झाली, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय.

Ahmednagar Crime
Gangster Sharad Mohol Killed: पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या, कोण होता शरद मोहोळ? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com