Mumbai Four Year Old Girl Died: धक्कादायक! १९ मजली इमारतीतून खाली पडली चार वर्षांची चिमुकली

Couple Decided To Donate Darshani's Eye: शोकाकूल दाम्पत्याने दर्शनीचे नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला आहे
Mumbai Four Year Old Girl Died
Mumbai Four Year Old Girl DiedSaam Digital
Published On

Mumbai Four Year Old Girl Died

विरारमध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खिडकीतून पडून चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. दर्शनी सालियान असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे सालियान दाम्पत्य या मुलीला एकटे सोडून बाहेर गेले होते. या घटनेमुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दर्शनीला झोपेतून अचानक जाग आली आल्यांनतर तिने आई-वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे खिडकीतून वाकून पाहताना तिचा तोल जाऊन ती खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या शोकाकूल दाम्पत्याने दर्शनीचे नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

सालियान दाम्पत्य विरारमधील वाय.के.नगरमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या १९ मजली इमारतीत भाड्याने रहात होते. दरम्यान मंगळवारी सकाळी दर्शनी गाढ झोपेत असताना तिची आई दर्शनीच्या वडिलांना स्कुटरवरून रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी गेली होती. दर्शनी जागे होईपर्यंत ती परत येईल असे त्यांना वाटले होते. मात्र घरी यायला अर्धा तास लागला. येताना तिला कंपाऊंडमध्ये जमाव जमलेला दिसला. तिने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला. दर्शनी रक्ताच्या धारोळयात पडली होती. त्यांनतर दर्शनीला रुग्णालय दाखल केले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

सालियान दाम्पत्य या इमारतीत स्थलांतरित झाले असेल तरी या इमारतीच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच दर्शनीला जीव गमवावा लागला. शिवाय सालियान दाम्पत्य दररोज दर्शनाला स्टेशनला घेऊन जायचे. मात्र , ती रिक्षातून पडल्यांनंतर तिला घरीच सोडून जात असल्याचे दाम्पत्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून खुल्या बाल्कनी आणि खिकडक्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com