Thane Crime: फेरफटका मारायला गेला, परत आलाच नाही; चौघांनी रस्त्यात गाठलं, २५ वर्षीय तरुणाला जागीच संपवलं
Thane Crime Saam Tv

Thane Crime: ठाण्यात २५ वर्षीय तरुणाची हत्या, चौघांनी रस्त्यात गाठत जागीच संपवलं

Thane Police: ठाण्यामध्ये एका २५ वर्षीय तरुणाची चौघांनी हत्या केली. ठाण्याच्या लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली.
Published on

विकास काटे, ठाणे

ठाण्यामध्ये २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातल्या लक्ष्मीनगरमध्ये ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून चौघांनी या तरुणाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. या मारहाणीत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दर्शन शिंदे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन शिंदे (२५ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दर्शन ठाण्यातल्या सिद्धेश्वर तलाव परिसरात आईसोबत राहत होता. आधी तो लक्ष्मीनगरमध्ये राहत होता. पण त्याठिकाणी पुनर्वसनाचे काम सुरू असल्यामुळे तो सिद्धेश्वर तलावाजवळ राहण्यासाठी गेला होता.

Thane Crime: फेरफटका मारायला गेला, परत आलाच नाही; चौघांनी रस्त्यात गाठलं, २५ वर्षीय तरुणाला जागीच संपवलं
Kalyan Crime : घरात घेऊन जात गतिमंद मुलींचा विनयभंग; कल्याणमधील संतापजनक घटना, नराधम ताब्यात

आज संध्याकाळी दर्शन लक्ष्मीनगर येथे फेरफटका मारण्यासाठी गेला होता. याठिकाणी जुन्या रागातून चौघांनी त्याला बेदम मारहाण केली. हे सर्व तरुण राजवाडा येथे राहतात. या चौघांनी दर्शनला मरेपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दर्शनचा जागीच मृत्यू झाला.

Thane Crime: फेरफटका मारायला गेला, परत आलाच नाही; चौघांनी रस्त्यात गाठलं, २५ वर्षीय तरुणाला जागीच संपवलं
Crime News : बायको-मुलीची हत्या, मग स्वत:ला संपवलं; मृत्यूपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...

घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. दर्शनचा मतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून ठाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वर्तकनगर पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे लक्ष्मीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

Thane Crime: फेरफटका मारायला गेला, परत आलाच नाही; चौघांनी रस्त्यात गाठलं, २५ वर्षीय तरुणाला जागीच संपवलं
Pune Crime : पुण्यात तरुणीचा लग्नाला नकार, तरुणानं नको ते केलं, शरीरसंबंधाचे 'ते' VIDEO शूट; मैत्रिणीला दिसताच भयंकर उलगडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com