Ration Card: रेशन दुकानावर रेशन मिळत नाही? अशा पद्धतीने करा तक्रार

Ration Card Complaint: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हाला रेशन दुकानावर रेशन मिळत नसेल तर अशा पद्धतीने तक्रार करा.
Ration Card
Ration CardSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहेत. त्यातील एका योजनेअंतर्गत नागरिकांना कमी किमतीत रेशन मिळते. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांना रेशन दुकानातून जीवनाव्यक वस्तू मिळतात. ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी राबवण्यात आली आहे.

भारत सरकार या नागरिकांना कमीत कमी खर्चात रेशन पुरवते. या योजनेअंतर्गत नागरिकांना गहू, तांदूळ, तेल, डाळी असे पदार्थ कमीत कमी रुपयांमध्ये मिळतात. रेशन कार्डधारकांना रेशन दुकानातून या गोष्टी मिळतात. जर कोणत्याही रेशनधारकांना या वस्तू मिळत नसतील तर त्याबाबत तुम्ही तक्रार करु शकतात. ही तक्रार तुम्ही कुठे आणि कशी करायची ते जाणून घ्या. (Ration Card)

Ration Card
Aadhaar Pan Link: तुमचे पॅन कार्ड होऊ शकतं बंद; आताच करा 'हे' काम

भारतातील सर्व राज्यांमध्ये अन्न पुरवठा विभागाकडून एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या नंबरवर फोन करुन तुम्ही रेशन कार्डसंबंधित तक्रार करु शकतात. तुम्हाला रेशन दुकानावर वस्तू मिळत नसल्याची तक्रार नोंदवू शकतात. याचसोबत तुम्ही अधिकृत वेबसाइटवरुन तुमच्या राज्याचा हेल्पलाइन नंबर मिळवू शकतात. तुम्हाला https://nfsa.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन नंबर मिळवायचा आहे. त्यानंतर तक्रार करा. यानंतर विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.

ऑनलाइन पद्धतीनेदेखील करु शकतात तक्रार

तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने तक्रार करु शकतात. यासाठी https://nfsa.gov.in/ या वेबसाइटवर जायचे आहे. त्यावर तक्रार यावर क्लिक करा. यानंतर तक्रार नोंदवा. जर तुमची तक्रार खरी असेल तर रेशन दुकानदारावर कारवाई होऊ शकते. (Ration Card News)

Ration Card
Ration Card Rule: रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल! फक्त ४५० रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलेंडर

कार्यालयात जाऊन तक्रार

तुम्हाला जर तुमच्या गावाच्या रेशन दुकानात वस्तू मिळत नसतील तर तुम्ही जिल्ह्याच्या रेशन दुकानात जाऊन तक्रार करा. जर तरीही तुमची तक्रार कोणी ऐकून घेतली नाही तर राज्याच्या अन्न पुरवठा विभागात जाऊन तक्रार नोंदवू शकतात.

Ration Card
Success Story: कोण म्हणतंय लग्नानंतर करिअरला ब्रेक लागतो? घर आणि नोकरी सांभाळत UPSC क्रॅक; IPS तनुश्रीची यशोगाथा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com