ChatGPT Lottery: ChatGPT वरून महिलेने जिंकली लॉटरी, कोट्यवधी रूपयांचे काय केलं, वाचून धक्का बसेल

AI Winning Story: एखादा एआय लॉटरीचे जिंकणारे आकडे सांगतोय. व्हर्जिनियातील मिडलोथियनमध्ये असेच घडले. हा फक्त योगायोग की खरे भाकित, अजूनही गुपित आहे.
ChatGPT Lottery: ChatGPT वरून महिलेने जिंकली लॉटरी, कोट्यवधी रूपयांचे काय केलं, वाचून धक्का बसेल
Published On

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रवेश करत आहे. कामकाजापासून मनोरंजनापर्यंत आणि माहिती शोधण्यापासून निर्णय घेण्यापर्यंत एआयवर लोकांचा अवलंब मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये मात्र एआयचा वापर एका अनोख्या प्रकारे उघड झाला आहे. मिडलोथियन येथे राहणाऱ्या कॅरी एडवर्ड्स या महिलेने लॉटरीसाठी नंबर निवडताना ‘चॅटजीपीटी’ची(Chatgpt) मदत घेतली आणि तिचे नशीब बदलले.

एडवर्ड्सने पॉवरबॉलसाठी चॅटजीपीटीकडून सुचवलेले नंबर निवडले. लॉटरीच्या ड्रॉमध्ये तिचे पाच नंबर जुळले आणि त्यामुळे तिला ५०,००० डॉलर्सचे बक्षीस लागले. पण तिने "पॉवर प्ले" हा पर्याय निवडल्यामुळे तिचे पारितोषिक थेट तिपटीने वाढून १,५०,००० डॉलर्स झाले, ज्याची भारतीय रूपयांमध्ये किंमत अंदाजे १.३२ कोटी रुपये इतकी होते.

बक्षीस लागल्याची सूचना फोनवर मिळाल्यावर सुरुवातीला एडवर्ड्सला ते एक प्रकारचा फसवा संदेश वाटला. मात्र जेव्हा अधिकृत खात्री झाली तेव्हा तिला स्वतःलाही धक्का बसला. तरीसुद्धा या अनपेक्षित संपत्तीबाबत एडवर्ड्सने जे केले ते सर्वांना प्रेरणादायी वाटले.

एडवर्ड्सने जाहीर केले की ती संपूर्ण बक्षीस रक्कम दान करणार आहे. तिने तिच्या पतीला मृत्युमुखी पाडणाऱ्या आजाराच्या संशोधनासाठी असोसिएशन फॉर फ्रंटोटेम्पोरल डीजनरेशन (AFTD), उपासमारीशी झगडणाऱ्या शालोम फार्म्स आणि अमेरिकन लष्करातील जवान व त्यांच्या कुटुंबांना मदत करणाऱ्या नेव्ही-मरीन कॉर्प्स रिलीफ सोसायटी या तिन्ही संस्थांना पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे एडवर्ड्स म्हणाली, हे दैवी आशीर्वाद माझ्याकडे आल्यानंतर मला लगेच समजले की याचे काय करायचे आहे. मी ते पूर्णपणे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. माझा विश्वास आहे की जेव्हा लोकांना अनपेक्षित परीने आशीर्वाद मिळतो, तेव्हा त्यांनी तो इतरांच्या मदतीसाठी वापरावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com