.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
आपण सर्वजण व्हॉट्सअॅप कॉल्सचा वापर मोठ्या प्रमाणात करतोय. व्हॉट्सअपवरून कॉल करणं अजून सुलभ होणार आहे. कारण मेटाने व्हॉट्सअॅपमध्ये एक अद्भुत फीचर लाँच केलंय. या फीचरच्या मदतीने तुम्ही आता व्हॉट्सअॅपला डिफॉल्ट अॅप म्हणून सेट करू शकतात. परंतु हे फीचर्स सर्वांसाठी उपलब्ध नाहीये.
पण या फीचर्सच्या मदतीने तुम्ही कॉल कराल तर तुम्हाला सीमद्वारे कॉल करण्याची गरज नसेल. म्हणजेच हा कॉल थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लागेल.यासाठी तुम्हाला वारंवार व्हॉट्सअॅप अॅपवर जाऊन नंबर डायल करावा लागणार नाहीये.
तुमच्या फोनवरील अनेक असे अॅप्स असतात ज्याची कार्य आधी फिक्स करून ठेवलेली असतात. जसे तुमच्या मेसेजिंग अॅपवर मेसेज येतात. फोन कॉल करण्यासाठी तुम्हाला डायलर वापरावा लागतो. या अॅप्सला डीफॉल्ट अॅप्स म्हणतात. व्हॉट्सअॅप आता हे बदलण्याची संधी देत आहे. आतापर्यंत सामान्य कॉल करण्यासाठी तुम्हाला फोनचा डायलर वापरावा लागतो किंवा व्हॉट्सअॅपवरून कॉल करण्यासाठी तुम्हाला अॅपवर जाऊन कॉल करावा लागतो.
पण आता तुम्ही WhatsApp च्या नवीन फीचरचा वापर करून WhatsApp ला तुमचे डिफॉल्ट अॅप म्हणून सेट करू शकता. व्हॉट्सअॅप कॉलसाठी व्हॉट्सअॅप अॅपवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. तुमच्या फोन डायलरवरून कॉल केल्यानंतर तुमचा कॉल WhatsApp द्वारे केला जाईल. हे फीचर सध्या फक्त आयफोन युझर्ससाठी उपलब्ध आहे.
WhatsApp अपडेट केलं असल्याची खात्री करा.
हे फीचर सक्रिय करण्यासाठी, WhatsApp ला व्हर्जन २५.१०.७२ वर अपडेट करणे आवश्यक आहे.
त्यानंतर तुमच्या iOS डिव्हाइसवरील सेटिंग्जमध्ये जा.
सेटिंग्जमध्ये अॅप्स वर जा.
अॅप्समध्ये, "डीफॉल्ट अॅप्स" या पर्यायावर क्लिक करा.
डीफॉल्ट अॅप्स विभागातील कॉलिंग वर टॅप करा.
कॉलिंग विभागात तुमचे डीफॉल्ट कॉलिंग अॅप म्हणून WhatsApp निवडा. यानंतर तुम्हाला कन्फर्म होईल की आता कॉल करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जाईल. तुम्हाला हवे तेव्हा येथून तुम्ही फोन अॅपला पुन्हा तुमचे डीफॉल्ट अॅप बनवू शकता. याशिवाय, जर तुमच्या फोनमध्ये झूम किंवा फेसटाइम सारखे इतर कॉलिंग अॅप्स असतील तर तुम्ही त्यांना डीफॉल्ट कॉलिंग अॅप बनवू शकाल. दरम्यान हे फीचर सध्या फक्त iOS युझर्संसाठी उपलब्ध आहे. हे फीचर अँड्रॉइडवर उपलब्ध असेल की नाही याबद्दल मेटाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.