Wifi Vs Hotspot: वायफाय आणि हॉटस्पॉटमधला फरक तुम्हाला माहीत आहे का?

What Is Difference Between Wifi And Hotspot: जगातील लाखो लोक स्मार्टफोनचा वापर करतात. स्मार्टफोनमध्ये आपण वायफाय आणि हॉस्पॉट दोन्हीचा वापर करतो. या दोन्हींमधील फरक तुम्हाला माहित आहे का?
Wifi Vs Hotspot
Wifi Vs HotspotSaam TV
Published On

सध्या सर्वकाही डिजिटल झालं आहे. प्रत्येक कामासाठी आपल्याला इंटरनेटची गरज असते. कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी ते अगदी पैसे पाठवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. परंतु अनेकदा आपल्या मोबाईलचा डेटा संपतो त्यामुळे आपण दुसऱ्या व्यक्तीचे हॉटस्पॉट वापरतो. तसेच आपण ऑफिसमध्ये किंवा घरी वाय- फायचा वापर करतो. वाय फाय आणि हॉटस्पॉट दोन्हीही इंटरनेट सेवा पुरवण्याचे काम करते. पण मग या दोघांमध्ये फरक काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर आज आम्ही तुम्हाला वाय फाय आणि हॉट स्पॉटमधील फरक सांगणार आहोत.

Wifi Vs Hotspot
Government Schemes : स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी खिशात पैसे नाहीत? केंद्र सरकारच्या 'या' योजनांची होईल मोठी मदत

वाय फाय आणि हॉट स्पॉट दोन्हीही स्मार्टफोनला इंटरनेट सेवा पुरवण्याचे काम करतात. परंतु या दोघांमध्ये फरक आहे. वायफाय सिस्टीम हे वायरलेस इंटरनेट सर्व्हिस रिसीवर आहे तर हॉट स्पॉट हे इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, वायफाय आपण आपल्या फोनमध्ये घेतो म्हणजे त्याचा वापर करतो. तर हॉटस्पॉट हे दुसऱ्यांना वापरण्यासाठी दिले जाते. दुसऱ्या स्मार्टफोनला इंटनेट प्रोवाइड करण्यासाठी वापरले जाते.

WiFi म्हणजे काय? (What Is Wifi)

वाय फाय म्हणजे वायरलेस फॉर्म ऑफ कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (Wifi Full Form). वाय फाय हे स्थानिक ठिकाणी नेटवर्क पुरवण्यासाठी वापरले जाते. म्हणजे घरात किंवा ऑफिसमध्ये लॅननचा वापर करुन वाय फायची सर्व्हिस प्रोवाइड केली जाते. वाय फायमुळे इंटरनेटची स्पीड वाढते. एकाचवेळी अनेक युजर्स वायफायचा वापर करतात. परंतु यामुळे इंटरनेटची स्पीड कमी होत नाही. वायफाय हे हॉटस्पॉटपेक्षा खूप जास्त सुरक्षित आहे.

Wifi Vs Hotspot
SBI Scheme: फक्त ७३० दिवस गुंतवणूक करा अन् मिळवा भरघोस व्याज; SBI ची सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजना काय आहे?

हॉटस्पॉट म्हणजे काय? (What Is Hotspot)

हॉटस्पॉट (Hotspot) हे इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर म्हणून काम करते. वायफायच्या मदतीने हॉटस्पॉट काम करते. हॉटस्पॉट हे मोबाईलमध्ये वायफायसारखे काम करते. मोबाईलमध्ये हॉटस्पॉट नावाचा एक फीचर असते. ते ऑन केल्यावर तुमच्या फोनमधील इंटरनेट इतर स्मार्टफोन युजर्स वापरु शकतात.हॉट स्पॉटदेखील एकाच वेळी अनेक लोक वापरु शकतात. परंतु याचा इंटरनेट स्पीड हा कमी असू शकतो. हॉटस्पॉट हे वायफायपेक्षा कमी सुरक्षित आते. हॉटस्पॉट कनेक्शन अनोळखी व्यक्तीला दिल्याने तो त्याचा गैरवापरदेखील करु शकतो. त्यामुळे नेहमी काळजी घ्यायला हवी.

वायफाय आणि हॉटस्पॉटमधील फरक (What Is Difference Between Wifi And Hotspot)

वायफायचा वापर ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. एका वायफायवर अनेक लोक इंटरनेट सुविधा घेऊ शकतात. परंतु हॉटस्पॉट हे जास्तीत जास्त ५-६ लोकांपर्यंत मर्यादीत असते. वायफायसाठी एक राउटर बसवला जातो. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातच इंटरनेट कनेक्शन तयार होते. तर हॉटस्पॉट हे स्मार्टफोनच्या मदतीने दिले जाते. स्मार्टफोनमधील हॉट स्पॉटचे फीचर ऑन केल्यावर तुम्ही इंटरनेट वापरु शकतात.

Wifi Vs Hotspot
South Superstar: साउथचा हा सुपरस्टार फॅन्ससाठी कसा बनला देवमाणूस?, वाचा इनसाइड स्टोरी!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com